महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘सॉलिटरी बी’ मधमाश्यांचे होतेय नैसर्गिक संवर्धन; केआयटी कॉलेजमधील संशोधन

03:43 PM Feb 05, 2024 IST | Abhijeet Khandekar
KIT College
Advertisement

करण देवकर यांनी कॉलेज परिसरात लाकडापासून मधमाशांसाठी बनवले घरटे

अहिल्या परकाळे कोल्हापूर

जगामध्ये मधमाशांच्या 20 हजार प्रजाती आढळतात. त्यातील भारतामध्ये 800 प्रकारच्या मधमाशा अस्तित्वात आहेत. ‘सॉलिटरी बी‘ हा मधमाशीचा मोठ्या संख्येने अस्तित्वात असणारा एक प्रकार आहे. जवळपास 700 विविध प्रकारचे ‘सॉलिटरी बी‘ भारतात आढळतात. ‘सॉलिटरी बी‘ मधमाशा शांत स्वभावाच्या आहेत. वेलवर्णीय कडधान्य, भाज्यांच्या वाढीसाठी या मधमाशा अतिशय उपयुक्त ठरतात. सिमेंटच्या जंगलात ही मधमाशांची प्रजात लुप्त होत असल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट होत चालली आहे. त्यामुळे केआयटीत एम.टेक.मध्ये शिक्षण घेत असलेल्या करण देवकर याने महाविद्यालय परिसरात लाकडापासून घरटे ( बी हॉटेल) तयार करून या मधमाशांचे संवर्धन केले आहे. या प्रयोगात मधमाशांची प्रजनन क्षमता वाढल्याने मधमाशांची संख्याही वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.

Advertisement

‘सॉलिटरी बी‘ या मधमाश्यांच्या प्रजातींपैकी 500 प्रजाती जमिनीखाली घर करून राहतात. ‘सॉलिटरी बी‘ हा निसर्ग चक्रातील एक महत्त्वाचा घटक आहे. या प्रजातीच्या मधमाशा संवर्धनासाठी काहीतरी योगदान द्यावे. या विचाराने केआयटी पर्यावरण अभियांत्रिकीच्या करण देवकर या विद्यार्थ्याने प्रकल्प हाती घेतला. त्याने बांबू, जुन्या लाकूडात मधमाश्यांसाठी घरटे (हॉटेल बी)निर्माण केले. या घरट्यात काही मधमाश्या ठेवून त्यांना नैसर्गिकरित्या वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. ‘सॉलिटरी बी’च्या प्रजातींपैकी लीफकटर बी, रेझिन बी व मेसन बी या तीन वेगवेगळ्या प्रजातीच्या माश्या या लाकडांमध्ये स्थिरावल्या आहेत. त्यांची प्रजनन क्षमताही वाढली असून, या घरट्यात मधमाश्यांची संख्या वाढत आहे, हे या प्रयोगाचे यशच म्हणावे लागेल.

Advertisement

पदव्युत्तर शिक्षण घेताना करण याने केआयटी कॉलेज परिसरात वेगवेगळ्या आकाराचे लाकडी ठोकळे घेऊन त्याच्यामध्ये तांत्रिक मापांनी मधमाशांसाठी घरटे (हॉटेल बी) तयार केले. कॉलेजच्या परिसरात तीन ठिकाणी लाकडांच्या ठोकळ्यांची मांडणी करून मधमाश्या संवर्धन प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पांतर्गत गेल्या पाच महिन्यातील ‘सॉलीटरी बी‘ ची संख्यात्मक वाढ चांगली झाली आहे. नैसर्गिक वातावरणात त्यांना चांगले घरटे मिळाल्याने मधमाशांच्या प्रजनन क्षमतेमध्येसुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे आढळून आले आहे. प्रत्यक्ष कृतीशील संशोधनातून करण या विद्यार्थ्याने निसर्ग चक्रातील एक घटक असणाऱ्या ‘सॉलिटरी बी‘चे अस्तित्व अबादीद राखण्यास संशोधनातून मदत केली आहे.

मधमाशांचे अस्तित्व राखण्याचा प्रयत्न
माझ्या या कल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी केआयटीचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी तसेच मयुरा एआयसीटीई आयडिया लॅबचे मोठे सहकार्य मिळाले. निसर्गचक्रातील एका घटकाचे अस्तित्व राखण्यात माझ्या कृतीशील संशोधनामुळे थोड्या प्रमाणात का होईना मी यशस्वी झालो याचा मला आनंद आहे.

कॉलेज संशोधनासाठी सर्वोत्परी मदत करणार
अभ्यासक्रमाच्या बाहेरील पण निसर्गाला उपयुक्त असणारे पर्यावरण विषयावरील संशोधनाची संकल्पना करण याने मांडली. त्याला तात्काळ यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याची तयारी कॉलेजने दाखवली. बी हॉटेल तयार करण्यासाठी लागणारा सर्व खर्च महाविद्यालयाने दिला असून, भविष्यातही या प्रोजेक्टसाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याची महाविद्यालयाची तयारी आहे.
डॉ. मोहन वनरोट्टी, (संचालक, केआयटी कॉलेज)

शेतकऱ्यांसाठी फायदेशीर
मधमाशांमुळे फळे, फळभाजा, वेलवर्णीय कडधान्याचे चांगले उत्पन्न होण्यास मदत होते. सध्या झाडांची संख्या कमी होत असल्याने मधमाशाही कमी होत आहेत. या मधमाशांची संख्या वाढवून शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीस मदत कशी होईल. यासाठी प्राथमिक स्वरूपात करण याने केआयटीच्या परिसरात प्रयोग केला आहे. हा प्रयोग यशस्वी होत असल्याने, याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. त्याच्या समाजोपयोगी संशोधनाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

Advertisement
Tags :
'solitary bee'KIT CollegeNatural breeding
Next Article