For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पणजीत आजपासून राष्ट्रीय विज्ञान महोत्सव

11:59 AM Feb 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
पणजीत आजपासून राष्ट्रीय विज्ञान महोत्सव
Advertisement

अनेक राष्ट्रीय संस्थांचा सहभाग : तीन दिवस भरगच्च कार्यक्रम,देशभरातील विज्ञानप्रेमींना पर्वणी

Advertisement

पणजी : पणजीत आज दि. 26 पासून राष्ट्रीय विज्ञान दिन व विज्ञान महोत्सव-2024 चे आयोजन होत असून विज्ञान तंत्रज्ञान खात्याचे संचालक लेविन्सन मार्टिंन्स यांच्याहस्ते सकाळी 11 वाजता उद्घाटन होणार आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा महोत्सव मिरामार येथील गोवा विज्ञान केंद्रात होत असून दि. 28 रोजी त्याचा समारोप होणार आहे. या महोत्सवानिमित्त खास प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले असून त्यात  दोनापावला येथील एनआयओ, हैदराबाद येथील नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर-इस्रो, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मलेरिया, आरोग्य सेवा संचालनालय, गोवा, वेर्णा येथील फोरेन्सिक प्रयोगशाळा, हवामान वेधशाळा, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन एजन्सी, शिरोडा येथील गोमंतक आयुर्वेदिक महाविद्यालय, फ्रेंड्स ऑफ एस्ट्रॉनॉमी संघटना, आग्नेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, गोवा एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी, अरण्य पर्यावरण संशोधन संस्था, मेट्रोपॉलिस हेल्थकेअर, पुणे येथील कुतुहल विज्ञान कंपनी सहभागी होणार आहेत. हे प्रदर्शन स. 10 ते सायं. 5 या वेळेत  जनतेसाठी खुले राहणार आहे. उद्घाटन सत्रानंतर दु. 12 वा. रेसिंगसाठी गो-कार्टचा विकास, 2.30 वा. ड्रोन डेमोस्ट्रेशन, 3.30 वा. लिक्वीड नायट्रोजन शो, 4.30 वा. रोबोटिक डेमोन्स्ट्रेशन होणार आहे. दि. 27 रोजी सायं. 4 वा. फिंगरप्रिंट विज्ञान, 5 वा. व्हेक्यूम प्रेशर, आणि दि. 28 रोजी दु. 2.30 वा. जीएससीपीद्वारे ड्राय आईस शो होणार आहे. त्याशिवाय तिन्ही दिवस विविध स्पर्धा, कार्यशाळा, वैज्ञानिकांना भेटा यासारखे कार्यक्रमही होणार आहेत. त्यात इस्रोचे वैज्ञानिक डॉ. जया सक्सेना, डॉ. आशुतोष सक्सेना, एनआयओचे डॉ. सुहास शेट्यो, आरोग्य खात्याच्या डॉ. नंदिनी कोरगांवकर, तसेच डॉ. रमेश कुमार, आदी वैज्ञानिक उपस्थित राहणार आहेत. दि. 26 व 27 रोजी खगोलशास्त्र स्लाइड शो व आकाश निरीक्षण करण्याची संधी मिळणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.