महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

यंदा प्रथमच देणार राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार

06:48 AM Jan 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

केंद्र सरकार प्रथमच राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार देणार आहे. या पुरस्कारांसाठी विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात अतुलनीय कामगिरी नोंदवणाऱ्यांकडून रविवारी नामांकने मागविण्यात आली आहेत. पुरस्काराचा भाग म्हणून पदक आणि प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. मात्र, त्यात रोख रक्कम असणार नाही.  नामांकन पाठवण्याची अंतिम तारीख 28 फेब्रुवारी आहे. 11 मे रोजी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनी पुरस्कारांची घोषणा होणार आहे. तर 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिनी पुरस्कार प्रदान केले जातील. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जैविक विज्ञान, गणित आणि संगणक विज्ञान, पृथ्वी विज्ञान, वैद्यकशास्त्र, अभियांत्रिकी विज्ञान, कृषी विज्ञान, पर्यावरण विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोपक्रम, अणुऊर्जा, अंतराळ या तेरा क्षेत्रांतील चार श्रेणींमध्ये एकूण 56 पुरस्कार दिले जातील. तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा समावेश आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article