महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सत्तरी अर्बनला राष्ट्रीय उत्कृष्ट सहकारी पतसंस्था पुरस्कार

12:43 PM Dec 04, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

केंद्रीय राज्यवित्तमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याहस्ते दिल्ली येथील व्रेडिट सोसायटी संमेलनात प्रदान

Advertisement

वाळपई : दिल्ली येथे झालेल्या सहकार भारती व्रेडीट सोसायटी राष्ट्रीय संमेलनात गोवा राज्यातील सत्तरी अर्बन मल्टीपर्पज को-ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीला राष्ट्रीय उत्कृष्ट सहकारी पतसंस्था पुरस्कार प्राप्त झाला. केंद्रीय राज्यवित्तमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते संस्थेचे चेअरमन वासुदेव परब यांनी इतर संचालक प्रेमनाथ हजारे, म्हाळू गावस, संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मण गावस यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार स्वीकारला. सहकार भारतीतर्फे दिल्ली येथे व्रेडिट सोसायटी राष्ट्रीय सहकार संमेलनाचे आयोजन केले आहे. संमेलनात देशाच्या वेगवेगळ्या राज्यातील अनेक संस्था  सहभागी झाल्या आहेत. सहकार क्षेत्राला पारदर्शकता निर्माण व्हावी व प्रोत्साहन मिळावे या अनुषंगाने सहकार भारतीतर्फे या संमेलनातून विविध राज्यासाठी उत्कृष्ट सहकारी पतसंस्था पुरस्कार जाहीर करण्यात येतात. गोवा राज्याच्या पुरस्कारासाठी सत्तरी अर्बन मल्टिपर्पज को-ऑप. क्रेडिट सोसायटीची निवड झाली. यामुळे संस्थेच्या सभासदांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. या संमेलनात सहभागी होण्यासाठी गोव्याच्या अनेक सहकारी संस्थांचे संचालक मंडळ व प्रतिनिधी उपस्थित होते. केंद्रीय राज्यवित्तमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सत्तरी अर्बन क्रेडिट संस्थेला उत्कृष्ट सहकारी संस्था पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल  संचालक मंडळ व सभासदांचे अभिनंदन केले. संस्थेला प्राप्त झालेला पुरस्कार हा संचालक मंडळांबरोबरच कर्मचारी व संस्थेच्या सभासदांचा गौरव असल्याचे चेअरमन वासुदेव परब यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article