महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कारवार लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय मराठा पक्षाचे उमेदवार श्यामसुंदर गायकवाड

10:08 AM Mar 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कारवार : कारवार (कॅनरा) लोकसभा मतदार संघातील निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.  राज्यात भाजप आणि निजदची युती झाल्याने, निजदचा उमेदवार कोण? हा प्रश्नच निर्माण होत नाही. दरम्यान, राष्ट्रीय मराठा पक्षाचे उमेदवार म्हणून मराठा समाजाचे नेते श्यामसुंदर गायकवाड यांची घोषणा करण्यात आली आहे. कारवारसह राज्यातील अन्य काही मतदारसंघातून भाजपकडून मराठा समाजातील उमेदवारांना संधी द्यावी, अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येत होती. गायकवाड यांना कारवार लोकसभा मतदारसंघातून निवडणूक संधी देण्याची जोरदार मागणी केली जात होती. तथापि भाजपने गायकवाड किंवा मराठा समाजातील नेत्यांची मागणीची दखल न घेतल्याने नाराज झालेल्या मराठा समाजाने कारवारसह अन्य मतदारसंघातून मराठा उमेदवारांची घोषणा केली आहे. गायकवाड यांच्या मते कारवार मतदारसंघातील मराठा मतदारांची संख्या 4 लाखाहून अधिक आहे. खानापूर आणि हल्याळ विधानसभा मतदारसंघात मराठ्यांची मते निर्णायक मानली जातात. कित्तूर, कारवार, यल्लापूर आणि शिरसी विधानसभा मतदारसंघातही मराठा समाज मोठ्या संख्येने वास्तव्य करून आहे. कारवार लोकसभा मतदारसंघात 1952 पासून आजअखेर 17 वेळा लोकसभेची निवडणूक झाली आहे. तथापि या मतदारसंघातून केवळ एकदाच मराठा उमेदवार निवडून आले होते. 1977 मधील निवडणुकीत कारवारचे सुपूत्र आणि काँग्रेसचे उमेदवार बी. पी. कदम निवडून आले होते. जनता पक्षाच्या लाटेतही कदम यांनी मातब्बर उमेदवार रामकृष्ण हेगडे यांचा पराभव केला होता. 18 व्या लोकसभेच्या निवडणुकीत मराठा उमेदवाराला भाजपकडून संधी दिली जाईल, अशी अपेक्षा होती. तथापि भाजप नेते बी. एस. येडीयुरप्पांसह अन्य वरिष्ठांनी मराठा समाजाकडे दुर्लक्ष केल्याने मराठा समाजाने स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article