महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आज राष्ट्रीय लोकअदालत

11:26 AM Jul 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : राष्ट्रीय लोकअदालत शनिवार दि. 13 रोजी आयोजित करण्यात येणार असून या लोकअदालतीमध्ये प्रलंबित खटले निकालात काढले जाणार आहेत. संपूर्ण जिल्ह्यातील न्यायालयामध्ये या लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. तीन महिन्यांनंतर ही लोकअदालत भरविण्यात येणार असल्याने याचा पक्षकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कायदा सेवा प्राधिकार सचिव मुरली मनोहर रेड्डी यांनी केले आहे. लोकअदालत तीन महिन्यांतून एकदा भरविली जाते. महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी ही लोकअदालत भरविण्यात येत असून प्रत्येक लोकअदालतीमध्ये हजारो खटले निकालात काढले जात आहेत.

Advertisement

मुख्य जिल्हासत्र न्यायाधीश त्यागराज एन. इनवळ्ळी यांच्या मार्गदर्शनानुसार ही लोकअदालत भरविण्यात येणार आहे. या लोकअदालतीमध्ये फौजदारी, कर्जवसुली, बँक, विमा, दिवानी, कौटुंबिक यासह इतर खटल्यांचा निकाल काढण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले हे खटले निकालात काढून पक्षकारांना मदत केली जाणार आहे. पक्षकार आणि वकिलांनी जास्तीत जास्त याचा लाभ घ्यावा. जेणेकरून पक्षकाराचा वेळ व पैसा वाचेल असे आवाहन केले आहे. सर्वच न्यायालयांमध्ये लोकअदालत भरविण्यात येणार आहे. तेव्हा त्या न्यायालयात पक्षकार व त्यांच्या वकिलांनी उपस्थित रहावे, असे कळविले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article