भुवनेश्वरमध्ये राष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धा जानेवारीत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
येत्या जानेवारीत भुवनेश्वरमध्ये पहिली राष्ट्रीय अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धा भरविली जाणार असल्याची घोषणा अखिल भारतीय अॅथलेटिक फेडरेशनने मंगळारी केली आहे.
ओदीशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये सुसज्ज अशा कलिंगा स्टेडियम संकुलात ही स्पर्धा घेतली जाणार आहे. या स्पर्धेची तारीख अद्याप घोषित करण्यात आलेली नाही. राष्ट्रीय इनडोअर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धांचे पुढील वर्षांसाठी वार्षिक कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाणार आहे. भुवनेश्वरमध्ये होणाऱ्या या स्पर्धेचे वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल, असे अखिल भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशनचे अध्यक्ष बहाद्दुरसिंग सागो यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. आगामी वर्षातील राष्ट्रीय अॅथलेटिक्स इनडोअर चॅम्पियनशिप स्पर्धेच्या स्पर्धावेळापत्रकामध्ये पुरूष आणि महिलांसाठी इनडोअर पोलवॉल्ट या प्रकारासाठी स्वतंत्र स्पर्धा तसेच हेपॅथोलॉन क्रीडा प्रकारासाठी वेगळी स्पर्धा घेण्याचा विचार चालु आहे. आगामी होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि आशियाई क्रीडा स्पर्धा लक्षात घेवून राष्ट्रीय इनडोअर अॅथलेटिक्स स्पर्धांचे वेळापत्रक निश्चित करण्यात येईल.