नासाचा उपग्रह अंतराळात शोधणार सोने
चप्पलाच्या बॉक्सइतकाच आकार
नासाने अलिकडेच वैज्ञानिक शोधासाठी चप्पलाच्या बॉक्सच्या आकाराइतका बसर्टक्यूब नावाचा एक उपग्रह प्रक्षेपित केला आहे. या अत्यंत लहान उपग्रहाला स्पेसएक्सच्या 30 व्या कमर्शियल रीसप्लाय सर्व्हिसमिशनसोबत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या दिशेने पाठविण्यात आले आहे. पहिल्यांदाच इतक्या छोट्या आकाराचा उपग्रह गामा रे प्रस्फोट म्हणजेच जीआरबी यासारख्या घटनांचा शोध घेणार आहे. याचबरोबर तो या इन प्रस्फोटांतून निघणाऱ्या गुरुत्व तरंगांची देखील ओळख पटविणार आहे.
या उपग्रहाचा उद्देश गामा रे बर्स्टस किंवा जीआरबीचा शोध घेणे आहे. जीआरबी दुर्गम गॅलेक्सीत होणारी ब्रह्मांडाची सर्वात शक्तिशाली उर्जावान घटना मानली जाते. जीआरबी एकप्रकारे सोन्याची फॅक्ट्रीच असते असे मानले जाते, कारण यात सोन्यासारख्या घटकांची निर्मिती होते.
बर्स्टक्यूब जीआरबीचा जन्म होण्याच्या रहस्यांसोबत त्याच्या वैशिष्ट्यांचेही अध्ययन करणार आहे. अंतराळ स्थानकात पोहोचल्यावर हे खुले होत कक्षेत स्थापित केले जाणार आहे. आकारात छोटे असूनही हे मोठ्या घटनांचे अध्ययन करणार आहे. याच्याद्वारे जमविण्यात आलेल्या माहितीतून खगोलशास्त्रज्ञ अनेक रहस्यांवर काम करतील. जीआरबीविषयी ते दोन न्यूट्रॉन ताऱ्यांच्या विलयानंतर निर्माण होतात असे सांगण्यात येते. हे तारे परस्परांमध्ये विलीन झाल्यावर मोठ्या प्रमाणात ऊर्जेसोबत गुरुत्व तरंगांचेही उत्सर्जन करतात. त्यांच्यामधून अत्यंत शक्तिशाली आणि तीव्रतायुक्त ऊर्जा निघते, जेथे तापमान आणि घनत्व अत्यं अधिक होते. यामुळे सोने आणि आयोडिन यासारख्या पदार्थांच्या निर्मितीची स्थिती निर्माण होते. ब्रह्मांडात आणखी कुठे अशाप्रकारच्या घटकांची निमिर्ती होऊ शकत नाही. बर्स्टक्यूबचे उपकरण 50 हजार ते 10 लाख इलेक्ट्रॉन वलोटच्या ऊर्जायुक्त गामा रे प्रस्फोटचा शोध लावण्यास सक्षम असणार आहे.