गुरुच्या चंद्रावर जीवसृष्टीची शक्यता पडताळणार नासा
अंतराळयान 2030 मध्ये पोहोचणार ‘युरोपा’च्या पृष्ठभागाली समुद्र असल्याचे संकेत
वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को
गुरु ग्रहाचा चंद्र युरोपावर जीवसृष्टीची शक्यता पडताळून पाहण्यासाठी नासाने युरोपा क्लिपर नावाचे अंतराळयान प्रक्षेपित केले आहे. अंतराळयानाला फ्लोरिडाच्या केनेडी अंतराळ केंद्रातून एलन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सच्या फाल्कन हेवी रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आले.
ही मोहीम 6 वर्षांची असून यादरम्यान अंतराळयान सुमारे 3 अब्ज किलोमीटरचे मार्गक्रमण करणार आहे. युरोपा क्लिपर 11 एप्रिल 2030 रोजी गुरु ग्रहाच्या कक्षेत दाखल होणार आहे. यानंतर पुढील 4 वर्षांमध्ये हे 49 वेळा युरोपा चंद्राच्या जवळून जाणार आहे. गुरु ग्रहाच्या चंद्राच्या हिमाच्छादित पृष्ठभागाखाली महासागर असल्याचे वैज्ञानिकांचे मानणे आहे. यामुळे हा उपग्रह वास्तव्ययोग्य ठरू शकतो. युरोपा क्लिपर अंतराळयानावर अनेक सोलर पॅनेल लावण्यात आले आहेत.
43 हजार कोटीचा खर्च
अन्य ग्रहावरील संशोधनासाठी नासाकडून आतापर्यंत निर्माण करण्यात आलेले हे सर्वात मोठे अंतराळयान आहे. याचा आकार एका बास्केटबॉल कोर्टपेक्षाही अधिक आहे. या मोहिमेवर नासाने 43 हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. अंतराळयान युरोपा चंद्राच्या अध्ययनासाठी स्वत:सोबत 9 उपकरणे घेऊन गेला आहे. यात कॅमेरा, स्पेक्टोमीटर, मॅग्नेटोमीटर आणि रडार सामील आहे. याच्याद्वारे वैज्ञानिक गुरु ग्रहाच्या चंद्रावर असलेल्या महासागराच्या खोलीबद्दल संशोधन करू शकणार आहेत. याचबरोबर युरोपाच्या पृष्ठभागावर जीवसृष्टीसाठी आवश्यक अन्य गोष्टींच्या अस्तित्वाचा ते शोध घेणारआहेत. चंद्राच्या पृष्ठभागावरील मॅग्नेटिक फील्डचीही पडताळणी केली जाणार आहे.
28 वर्षांपूर्वी मिळाले होते संकेत
1979 मध्ये वॉयजर 2 मिशन गुरु ग्रहाच्या जवळून गेले होते. तेव्हा त्याने युरोपा चंद्राची काही छायाचित्रे टिपली होती. यात चंद्रावर काही ख•s आणि क्रेटर दिसले होते, ज्याला जियोलॉजिकल प्रोसेसची शक्यता पाहिले गेले होते. 1996 मध्ये नासाच्या गॅलिलिओ अंतराळयानाने युरोपाच्या मॅग्नेटिक फील्डची तपासणी केली होती. तेव्हा युरोपावर खारट पाणी असल्याचे संकेत मिळाले होते.