नासाला मिळाला एक चंद्र
लाव्हारसाचे करतोय उत्सर्जन
नासाच्या वैज्ञानिकांनी असा ‘बाहेरील चंद्र’ शोधला आहे, जो अत्यंत प्रतिकूल स्थिती राखून आहे. हा पहिला अधिकृत एक्सोमून देखील असू शकतो. धातूने तयार झालेल्या या चंद्राच्या पृष्ठभागावर तप्त लाव्हारस वाहत आहे. याच्या पृष्ठभागातून विषारी वायूंचा फवारा बाहेर पडत आहे. तसेच याच्या आसपास वीज कडाडत आहे.
ज्वालामुखीप्रमाणे विस्फोट होत असलेल्या चंद्राचा लवकरच अंत होणरा आहे. हा ज्या डब्ल्यूएएसपी-49बी ग्रहाला प्रदक्षिणा घालत आहे, तो देखील वेगळ्या सृष्टीचा आहे. तो ग्रह आणि त्याचा तारा दोघेही धगधगत आहेत. हा चंद्र स्वत:चा ग्रह आणि ताऱ्यादरम्यान आहे. याचमुळे दोन्हीकडून उष्णता प्राप्त होत आहे. याचा जन्म एका धातूच्या ढगाप्रमाणे झाला असावा.
हा चंद्र लवकरच संपुष्टात येणार आहे. डब्ल्यूएएसपी-49बी एग्जोप्लॅनेट ओ. म्हणजेच बाहेरील ग्रह. आमच्या सौरमंडळात असलेल्या ग्रहाला बाहेरील ग्रह म्हटले जाते. हा ग्रह गुरु ग्रहापेक्षा तीनपट लहान आणि पृथ्वीपासून सुमारे 635 प्रकाशवर्षे दूर आहे. या ग्रहाचा शोध 2012 मध्ये झाला होता. हा ग्रह स्वत:च्या ताऱ्याभोवती 2.8 दिवसात एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. याचे तापमान 1100 अंश सेल्सिअस इतके आहे.
2017 मध्ये वैज्ञानिकांनी डब्ल्यूएएसपी-49बी आणि त्याच्या ताऱ्यादरम्यान सोडियमचा अत्यंत मोठा ढग पाहिला, एखाद्या ग्रहाच्या चहुबाजूला ढगाने प्रदक्षिणा घालणे हैराण करणारे होते. कारण डब्ल्यूएएसपी-49बी आणि त्याचा तारा हे दोन्ही मिळून अशाप्रकारच्या पदार्थाला जन्म देऊ शकत नव्हते. नंतर या रहस्याची उकल झाली. तो एक चंद्र असल्याचे स्पष्ट झाले आणि त्याच्या पृष्ठभागावरून लाव्हारस वाहत आहे. त्यातून तप्त सोडियम देखील उत्सर्जित होत आहे.
हा चंद्र दर सेकंदाला 1 लाख किलोग्रॅम सोडियम उत्सर्जित करत आहे. इतके सोडियम डब्ल्यूएएसपी-49 बी ग्रहाच्या आत देखील नसेल. हा चंद्र स्वत:हून सोडियमचा ढग निर्माण करत आहे. प्रत्यक्षात हे कार्य सर्वसाधारणपणे एखादा ग्रह किंवा ताराच करत असतो असे नासा वैज्ञानिक रोसाली लोप्स यांनी म्हटले आहे.