For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नासाने शोधला समुद्राचा ‘थानोस’

06:21 AM Jan 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
नासाने शोधला समुद्राचा ‘थानोस’
Advertisement

यात सामावू शकतात पाचही महासागर

Advertisement

पृथ्वीवर प्रशांत, अटलांटिक, आर्क्टिक, हिंदी आणि अंटार्क्टिक महासागर आहेत. या पाचही महासागरांचे पाणी एकत्र केले तरीही त्या जलभांडाराला भरू शकणार नाहीत, ज्याचा शोध अलिकडेच नासाच्या वैज्ञानिकांनी लावला आहे. हा महासागर आमच्या पृथ्वीपासून सुमारे 12 अब्ज प्रकाशवर्षे दूर ब्रह्मांडात आहे. हा आतापर्यंतचा सर्वात मोठा महासागर मानला जात आहे. हा इतका मोठा आहे की पृथ्वीवरील सर्व पाणी यात जमा केले तरीही तो रिकामीच राहणार आहे.

ब्रह्मांडात असलेल्या एका क्वासरमध्ये हा जलभांडार शोधण्यात आला असून तेथे मोठ्या प्रमाणात पाणी आहे. या महासागराला एपीएम 08279 प्लस 5255 नाव देण्यात आले आहे. कॅलिफोर्नियाच्या पासाडेना येथील नासाच्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेचे वैज्ञघनिक मॅट ब्रॅडफोर्ड यांनी याचा शोध लावला आहे.

Advertisement

वैज्ञानिक याला समुद्राचा थानोस असे संबोधित आहेत. कारण हा महासागर इतका विशाल आहे की यात पृथ्वीवरील सर्व महासागरांच्या जलसाठ्यापेक्षा 40 खर्व पट अधिक पाणी आहे.  ज्या क्वासरमध्ये याचा शोध लावण्यात आला आहे, तो अद्वितीय आहे, कारण हा जलभांडार स्वत:च मोठ्या प्रमाणात पाणी निर्माण करत आहे. तर या क्वासरचा शोध 50 वर्षांपूर्वी लावण्यात आला होता अशी माहिती ब्रॅडफोर्ड यांनी दिली आहे.

माणूस पृथ्वीसोबत इतर ग्रहांवर दीर्घकाळापासून पाण्याचा शोध घेत आहे. चंद्रावर पाण्याचे अणू मिळाले आहेत, परंतु त्याचा ठोस पुरावा नाही. अशा स्थितीत या जलभांडाराचा शोध वैज्ञानिकांना चकित करणारा ठरला आहे. ब्रह्मांडाच्या सुरुवातीपासून पाणी अस्तित्वात होते आणि अशाप्रकारचे आणखी जलभांडार असू शकतात याचा हा संकेत आहे. क्वासरमध्ये पाण्याचा भांडार मिळणे हा ब्रह्मांडाच्या प्रारंभीच पाण्यासोबत जीवनासाठी अन्य पोषक घटकही अस्तित्वात होते याचाही संकेत आहे.

Advertisement
Tags :

.