महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नासा प्र्रमुख आज भारत दौऱ्यावर

06:39 AM Nov 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

नासा प्रमुख बिल नेल्सन हे आज भारतात दाखल होणार आहेत. भारताच्या चांद्रमोहिमेच्या यशाच्या पार्श्वभूमीवर नेल्सन हे भारतातील अनेक महत्त्वपूर्ण बैठकांमध्ये सहभागी होणार आहेत. नवोन्मेष आणि संशोधनाशी निगडित क्षेत्रे, विशेषकरून खगोलशास्त्रातील द्विपक्षीय सहकार्य वृद्धींगत करण्यासाठी नेल्सन हे उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. यादरम्यान ते नासा आणि इस्रोची संयुक्त मोहीम निसारविषयी जाणून घेणार आहेत. तसेच या मोहिमेसंबंधी त्यांच्याकडून मोठी घोषणा केली जाऊ शकते.

Advertisement

बिल नेल्सन यांचा भारत दौरा दोन्ही देशांच्या उदयोन्मुख तंत्रज्ञानासंबंधीची प्रतिबद्धता पूर्ण करतो. नेल्सन हे स्वत:च्या दौऱ्यादरम्यान भारतातील अनेक ठिकाणांना भेट देणार असून यात बेंगळूर येथील निसार सॅटेलाइट मिशनही ते पाहणार आहेत असे नासाकडून सांगण्यात आले. निसार ही नासा आणि इस्रोची संयुक्त मोहीम आहे. निसारसंबंधी दोन्ही यंत्रणांकडून काम जवळपास पूर्ण झाले आहे. 2024 मध्ये निसार प्रक्षेपित केला जाणार आहे. सध्या याकरता प्रक्षेपणपूर्व होणारे परीक्षण आणि इंटिग्रेशनचे काम होत आहे. अशा स्थितीत नेल्सन हे भारतीय अंतराळ वैज्ञानिकांकडून निसार मोहिमेशी निगडित माहिती प्राप्त करणार आहेत. निसार नासा-इस्रो सिंथेटिक एपर्चर रडारचे संक्षिप्त नाव आहे.

नासा आणि इस्रो यांच्यादरम्यना पहिली उपग्रहीय मोहीम म्हणून निसार हा अर्थ ऑब्जर्विंग उपकरण आहे. याच्या माध्यमातून पृथ्वीवरील बदलांवर देखरेख ठेवली जाणार आहे. पृथ्वीचे बदलले पर्यावरण, गतिशील पृष्ठभाग आणि बर्फाचे आकारमान इत्यादींचा अनुमान लावत बायोमास, नैसर्गिक आपत्ती, समुद्राच्या पातळीसंबंधी माहिती या उपग्रहाकडून प्राप्त होणार आहे. भूजल, हवामान बदल, कृषीशी निगडित प्रकरणांमध्ये वैज्ञानिकांना या उपग्रहाकडून महत्त्वाचे मार्गदर्शन प्राप्त होणार आहे.

निसार विकसित करण्यासाठी इस्रो आणि नासा यांच्यात 2014 मध्ये करार झाला होता. 2800 किलोग्रॅम वजनाच्या या उपग्रहात 39 फूटांचा फिक्स्ड अँटेना रिफ्लेक्टर आहे. या अँटेनामध्ये छोट्यातील छोट्या बदल देखील टिपण्याची क्षमता आहे. तसेच काळे ढग दाटून आल्यावरही पृथ्वीचे निरीक्षण या उपग्रहाकडून होऊ शकणार आहे. यातील सिंथेटिक अपर्चर रडार हाय रिझोल्युशनची इमेज पाठवू शकणार आहे. हा उपग्रह 3-5 वर्षांपर्यंत सलग काम करू शकतो. या उपग्रहाचा उद्देश कृषी आणि हवामानाशी संबंधित अधिक विश्वासार्ह स्पेस इनपूट प्राप्त करणे आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article