For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आता जुन्या संसदेच नाव 'संविधान भवन' ; संसदेला निरोप देताना पंतप्रधानांची घोषणा

12:59 PM Sep 19, 2023 IST | Abhijeet Khandekar
आता जुन्या संसदेच नाव  संविधान भवन    संसदेला निरोप देताना पंतप्रधानांची घोषणा
Advertisement

Narendra Modi Speech : आज नव्या संसद भवनाचा  श्रीगणेशा झाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, सदनातील सदस्यांनी भारताला घडवण्यासाठी निर्णय घेतले.भारत लवकरच जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल.सेंट्रल हॉल अनेक ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार आहे.याच सदनात मुस्लिम भगिनींना न्याय मिळाला.अनेक महत्त्वाचे कायदे याच वास्तूत लागू झालेत.देशाच्या लोकशाहीसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे.नव्या संसदेची प्रतिष्ठा कायम राखायची आहे. प्रतिष्ठा धोक्यात येईल असे कोणतेही वर्तन करायला नको असं आवाहन, विनंती केली. याचबरोबर जुन्या वास्तूचा मान कायम राहिला पाहिजे. जुन्या इमारतीचं नाव 'संविधान भवन' करावं,अशी घोषणा करत उपराष्ट्रपतींना मोंदीनी सूचना केल्या.

Advertisement

यावेळी बोलताना ते म्हणाले की, भारतातील बँकींग क्षेत्राची जगात चर्चा आहे.संपूर्ण जगाला भारताबद्दल आकर्षण आहे.भारताला आता मोठ्या स्केलवर काम करावे लागेल. भारत लवकरच जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल.जगात 'आत्मनिर्भर भारत'मॉडेलची चर्चा आहे.सदनातील सदस्यांनी भारताला घडवण्यासाठी निर्णय घेतले.आपल्याकडे 75 वर्षांचा वारसा आहे. छोट्या कागदावर मोठं चित्र रेखाटता येत नाही.त्याचप्रकारे भव्य विचारांशिवाय भारत भव्य होणार नाही.जगाच्या आवश्यकता पूर्ण करण्य़ासाठी तयार राहायचयं.आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाला पूर्ण करायचंय.भारत नव्या उर्जेनं पुढ सरसावतोय. याच संसदेतून कलम 370 हटवलं.याच सदनात मुस्लिम भगिनींना न्याय मिळाल्याचेही मोदी म्हणाले.

Advertisement
Advertisement
Tags :

.