महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

शिंदे गटाचा आमदार भाजपाच्या गळाला?

12:12 PM Oct 03, 2022 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

Advertisement

भंडाऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचा कार्यकर्ता मेळावा होत आहे. या मेळाव्याला शिंदे गटातील आमदार नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar) यांनी हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. भोंडेकर भाजपाच्या गळाला लागले की काय? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Advertisement

नरेंद्र भोंडेकर हे भंडाऱ्यातील अपक्ष आमदार असून, ते शिंदे गटात आहेत. आज भंडाऱ्यात होत असलेल्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्याला त्यांनी हजेरी लावली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याशेजारी ते व्यासपीठावर बसले होते. तसेच त्यांनी गळ्यात भाजपचा गमछाही घातला होता. त्यांनी व्यासपीठावरुन भाषणही केलं.

अधिक वाचा : पाणीबिल वादातून मुख्यमंत्र्यांवरील हल्ल्याबाबत खोटी माहिती, तरुणाला ताब्यात घेऊन दिले सोडून

भोंडेकर यांनी भाषणात देवेंद्र फडणवीस हेच आपले गुरू आहेत. त्यांच्यामध्ये राज्याचे नव्हे तर देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे, असे सांगत भंडारा नगपरिषदेवर भाजपचीच सत्ता येईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त केला. त्यामुळे भोंडेकर भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article