For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नारायण राणे अडीच लाखाच्या मताधिक्क्याने निवडून येणार - विशाल परब

04:41 PM May 02, 2024 IST | अनुजा कुडतरकर
नारायण राणे अडीच लाखाच्या मताधिक्क्याने निवडून येणार   विशाल परब
Advertisement

दोडामार्ग - वार्ताहर

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अर्थात भाजप सरकारच्या माध्यमातून देशातील तळागाळातील असंख्य जनतेला अनेक योजनांचा फायदा झाला आहे. अनेक हितकरी योजना आमचे सरकार राबवित आहे. शिवाय आमचे नेते नारायण राणे यांनी आपल्या संपूर्ण राजकीय कारकीर्दीत जे जे कोकणसाठी केले आहे ते येथील जनता जनार्दन कधीही विसरू शकत नाहीत. तसेच आमच्या पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते गावागावात आपला जीव झोकून प्रचार करत त्यामुळे ना. नारायण राणे अडीच लाखाच्या मताधिक्क्याने निवडून येणार आहे असा विश्वास भाजप युवा मोर्चाचे राज्य प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी व्यक्त केला.

विशाल परब हे गुरुवारी दोडामार्ग दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी तालुका भाजप कार्यालयाला भेट दिली. यावेळी भाजप जिल्हाउपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, एकनाथ नाडकर्णी, तालुकाध्यक्ष सुधीर दळवी, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, नगरसेवक संतोष नानचे, रामचंद्र मणेरीकर, युवा मोर्चा चे तालुकाध्यक्ष पराशर सावंत, माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस, बांदा माजी सरपंच मंदार कल्याणकर, चंदू मळीक आदी अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

राऊतांची तेवढी कुवत नाही - विशाल परब
राजापूरच्या सभेत विनायक राऊतांवर महायुतीचे नेते कोणीही बोलले जात नाहीत असे विरोधक सध्या बोलत आहेत. मात्र विनायक राऊतांवर बोलण्याइतके राऊतांनी आपल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत एकही काम केले नाही आहे. त्यामुळे ज्यांची कुवतच नाही त्यांच्यावर काय बोलणार असा टोलाही विशाल परब यांनी राऊतांवर लगावला आहे. ना. राणे यांचे जिल्ह्यात अनेक विकास कामे आपल्या राजकीय कारकिर्दीत केले आहे. आज जो - जो मोठ्या प्रमाणात विकास दिसत आहे तो ना. राणे यांच्यामुळेच दिसत आहे. त्यामुळे नारायण राणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असेही आवाहन त्यांनी येथील जनतेला केले आहे.

आम्ही हटणारे कार्यकर्ते नाही आहोत - विशाल परब
आम्ही ना. राणे यांना विजयी करण्यासाठी जीव तोडून काम करत आहे. ना. राणे यांनी ज्या दिवशी अर्ज भरला त्याच दिवशी आम्ही कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला. आम्ही ना. नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे, आमदार नितेश राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्ते आहोत. आम्ही केव्हाही मागे हटणार नाही . राणे यांच्यासाठी सर्वांना एकत्र घेत काम करत राहणार असल्याचे यावेळी श्री. परब यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.