For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गतिमान विकासासाठी पुन्हा महायुती सरकार

04:12 PM Nov 14, 2024 IST | अनुजा कुडतरकर
गतिमान विकासासाठी पुन्हा महायुती सरकार
Advertisement

खा. नारायण राणे यांनी रेवंडी गावभेट दौऱ्यात व्यक्त केला विश्वास

Advertisement

निलेश राणे यांना मोठे मताधिक्य देण्याचा ग्रामस्थांचा निर्धार

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा समृद्ध करायचा आहे. पर्यटनातून जिल्ह्यात अधिक गतिमान विकास साध्य करायचा आहे. पुन्हा महायुती सरकारच. असे प्रतिपादन खा. नारायण राणे यांनी रेवंडी येथे बोलताना व्यक्त केले. दरम्यान, महायुती सरकार पुन्हा सत्तेत येणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीचे तीनही उमेदवार मोठया मताधिक्याने विजयी होणार असा विश्वासही खा. नारायण राणे यांनी व्यक्त केला.

Advertisement

विरोधकांचा समाचारही खा. नारायण राणे यांनी घेतला. उद्धव ठाकरे अडीज वर्षे मुख्यमंत्री होते मात्र दोन दिवस मंत्रालयात गेले. जनतेचे प्रश्न सोडवण्याची धमक नाही आणि कुवतही नाही. उद्धव ठाकरे विक्षित माणूस. तीच स्थिती महाविकास आघाडीची आहे. यां मतदारसंघात ही दहा वर्षे विकास ठप्प झाला. मात्र आता महायुती सरकार म्हणजे गतिमान विकास होणार. जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद सगळीकडे पाहता निलेश राणे यांचा विजय मोठया मताधिक्याने निश्चित आहे. असेही खा. राणे म्हणाले.

खा. नारायण राणे यांनी गावभेट दौऱ्याच्या निमित्ताने रेवंडी गावात ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, तालुकाप्रमुख राजा गांवकर, शिवसेना माजी सचिव किसन मांजरेकर, भाजपा ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष पुजा वेरलकर, युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, शिवसेना सोशल मीडिया जिल्हाप्रमुख हर्षद पारकर, भाजपा मसुरे विभाग प्रमुख मंगेश चव्हाण, आदी महायुती पदाधिकारी यासह माजी सभापती सोनाली कोदे, रेवंडी माजी सरपंच युवराज कांबळी, माजी सरपंच प्रिया कांबळी, तंटामुक्ती अध्यक्ष विजय कांबळी, ग्रापसदस्य विराज तळाशिलकर, प्राजक्ता कांबळी, प्रकाश कांबळी पांडुरंग कांबळी, जयराम कांबळी यांसह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास आणि विकासाची गंगा राणे साहेबच आणू शकतात हे त्यांनी दाखवून दिले. कार्यकर्ते जपणारे व जनतेवर प्रेम करणारे हे नेतृत्व आहे. अनेक कार्यकर्त्याना मानाची सन्मानाची पदे दिली. रेवंडी गावाला सोनाली कोदे यांच्या रूपाने 24 वर्षीय सभापती दिला. अनेकांना त्यांनी घडवले. त्यांच्या प्रमाणे आ. नितेश राणे व होणारे आमदार निलेश राणे जनतेत राहून काम करतात. हे सर्व पाहून विरोधक धास्तावले आहेत. वैभव नाईक यांचा पराभव निश्चित आहे. निलेश राणे 50 हजार पेक्षा जास्त मतांनी विजयी होणार. कारण हा माणूस दिलदार आहे. तीन वर्षे पूर्वी यांनी मला विचारले तुम्ही मालवण कुडाळ विधानसभा लढवा. मात्र तेव्हाच मी सांगितले विधानसभा तुम्हीच लढवायची. तुम्ही जिंकणार आणि 2014 चा बदला घेणार. असे यापूर्वीच सांगितले असे दत्ता सामंत म्हणाले. रेवंडी गावात 200 मिटरचा रस्ता वैभव नाईक करू शकले. हा यांचा दहा वर्षातील कारभार. प्रत्येक गावात विकासाच्या नावाने बोंब आहे. त्यामुळे जनतेला बदल हवा असुन निलेश राणे 50 हजार मतांनी विजयी होणार. असे दत्ता सामंत म्हणाले. यावेळी संजय आंग्रे, पुजा वेरलकर, बबन शिंदे यांनीही निलेश राणे यांचा विजयाचा विश्वास व्यक्त केला.

Advertisement
Tags :

.