अणाव आनंदाश्रम व पिंगुळी जिव्हाळा आश्रम येथील विकासकामांचा उद्या लोकार्पण सोहळा
रोटरी क्लब ऑफ शिरोडा यांच्या माध्यमातून केलेली विकास कामे
वेंगुर्ले (वार्ताहर)-
रोटरी क्लब ऑफ शिरोडा यांच्या माध्यमातून संजीवन सेवा ट्रस्ट संचालित आनंदाश्रय या आश्रमामध्ये केलेल्या विविध कामांचा तसेच सुविधांचा लोकार्पण सोहळा शुक्रवार दि. १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता अणाव, मयेकरवाडी येथील आनंदाश्रय संपन्न होणार आहे. तर दुपारी ३ वाजता पिंगुळी येथील जिव्हाळा आश्श्रमातील कामांचा लोकार्पण सोहळा होणार आहे.यावेळी आनंदाश्रय प्रवेशद्वार उद्घाटन, आश्रम परिसर पेवर ब्लॉक सुशोभिक रण कामाचे लोकार्पण, गो शाळेतील गो मातेसाठी संरक्षित चारा क्षेत्राला तारेचे कुंपण लोकार्पण, आश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना थर्मास वाटप करण्यात येणार आहे. तसेच रोटरी क्लब ऑफ शिरोडा यांचेतर्फे सुरेश बिर्जे यांच्या जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट संचलित जिव्हाळा आश्रम पिंगुळी येथील आश्रमातील लाभार्थीसाठी प्रदान करण्यात आलेल्या १००० लिटर पाण्याची टाकी व सोलार सिस्टीम यांचा लोकार्पण सोहळा कुडाळ-जिव्हाळा आश्रम दि. १५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता संपन्न होणार आहे. या लोकार्पण सोहळा रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शरद पै यांचे हस्ते, प्रमुख अतिथी रोटरीचे असिस्टंट गव्हर्नर महादेव पाटकर व डॉ. विद्याधर तायशेटे हे या दोन्ही सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत. या दोन्ही सोहळ्यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन रोटरी क्लब ऑफ शिरोडाचे अध्यक्ष जनार्दन पडवळ, अणाव येथील 'आनंदाश्रय' चे संस्थापक अध्यक्ष बबन काका परब, कार्याध्यक्ष रघुवीर मंत्री यांनी केले आहे.