महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

महायुतीचे उमेदवार नारायण राणेंनी बजावला मतदानाचा हक्क !

10:49 AM May 07, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

वरवडे -फणसनगर येथील शाळेत केले मतदान

Advertisement

कणकवली / प्रतिनिधी
महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वरवडे फणसनगर येथील शाळेत मतदानाचा हक्क बजावला. तीन लाखाच्या मताधिक्याने आपण विजयी होऊ असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी सौ. निलम राणे, स्नुषा सौ. प्रियांका निलेश राणे, भाऊ अशोक राणे यांनीही मतदान केले. तसेच सौ. नंदिता नितेश राणे यांनीही या केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. मला कोणताही पेपर कठीण जात नाही मी अभ्यास करूनच परीक्षेला बसतो. विरोधी उमेदवाराचे माझ्यासमोर कोणतेही आव्हान नाही. 2005 मध्ये मी या शिवसेनेचे डिपॉझिट जप्त केले होते. त्यामुळे मला आव्हान देण्याची भाषा कोणी करू नये. मतदारांनी वेळेत मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावावा व सिंधुदुर्गच्या विकासाला हातभार लावावा असे आवाहन श्री राणे यांनी यावेळी केले.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat news# narayan rane# sindhudurg# kankavli # losabha election2024
Next Article