For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

नंदकुमार साळुंखे यांना महाराष्ट्र शासनाचा श्री वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार जाहीर

08:00 PM Feb 23, 2024 IST | Abhijeet Khandekar
नंदकुमार साळुंखे यांना महाराष्ट्र शासनाचा श्री वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार जाहीर
Nandkumar Salunkhe

कोल्हापूर/ प्रतिनिधी

दैनिक तरुण भारत चे हातकणंगले तालुक्यातील टोप गावचे पत्रकार नंदकुमार रघुनाथ साळुंखे यांना महाराष्ट्र शासन कृषी विभागाचा श्री वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार कृषी विभागाच्या वतीने जाहीर करण्यात आला.

Advertisement

नंदकुमार साळुंखे हे दैनिक तरुण भारत मध्ये पंचवीस वर्षे झाले काम करत असून ग्रामीण भागातील विविध विषयावर लेखन करत असतात. साळुंखे यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च उत्पन्नामध्ये वाढ करण्यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणीवर मात करून त्यांना दैनिक तरुण भारत च्या माध्यमातून विशिष्ट प्रभावी शेती विषयक लेखन करून पारदर्शकपणे शेतकऱ्यांच्या यशोगाथा, तसेच कृषी विभागाकडील चर्चासत्रे शेतकरी मेळावे, बीज प्रक्रिया मोहीम, प्रदर्शने, अशा महत्त्वपूर्ण विषयावर लेखन करून पत्रकारितेत नवीन आदर्श निर्माण केला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून आज शासन निर्णयाद्वारे पुरस्कार जाहिर केले आहेत. नंदकुमार साळुंखे यांचा सत्कार जिल्हा कृषी अधीक्षक अरुण भिंगारदिवे व आत्माचे प्रकल्प संचालक श्रीधर काळे, महादेव जाधव, नामदेव मासाळ यांनी अभिनंदन केले. सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
×

.