For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नंदगड-हल्याळ रस्ता धोकादायक

11:25 AM Aug 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
नंदगड हल्याळ रस्ता धोकादायक
Advertisement

पोलिसांनीच काही खड्डे बुजवले : अपघातात एकाचा मृत्यू झाल्याने संताप

Advertisement

खानापूर : नंदगड-हल्याळ रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्याचे अस्तित्वच पूर्णपणे नष्ट झाले आहे. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांना या रस्त्यावरुन प्रवास करताना धोका पत्करुन प्रवास करावा लागत आहे. चार दिवसापूर्वी दुचाकीस्वार खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघातात जखमी झाले होते. उपचारादरम्यान रविवारी त्याचा मृत्यू झाला. याची दखल घेत नंदगड पोलिसांनी स्वत:च नंदगड-हल्याळ रस्त्यावरील काही खड्डे बुजवले आहेत. या भागातील नागरिकांना या रस्त्यावरुन प्रवास करताना धोका पत्करुन प्रवास करावा लागत आहे. चार दिवसापूर्वी इटगी येथील भीमाप्पा रामाप्पा भोई हे आपल्या दुचाकीवरुन जाताना कक्केरीजवळ खड्ड्यांचा अंदाज न आल्याने दुचाक वरुन पडून जखमी झाले होते. त्यांचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला आहे. या रस्त्यावर गेल्या दोन महिन्यांपासून सतत अपघाताची मालिकाच सुरू आहे. रस्त्याच्या मधोमध मोठमोठे खड्डे पडलेले आहेत.

या खड्ड्यांतून पाणी साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज वाहनचालकांना येत नसल्याने अपघात घडत आहेत. या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत वेळोवेळी मागणी करण्यात आली होती. मात्र बांधकाम खात्याने याबाबत कोणतीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्याच उद्ध्वस्त झाल्याने रस्त्याचे अस्तित्वच नष्ट झाले आहे. हल्याळ व खानापूर लोकप्रतिनिधीनी याबाबत शासनदरबारी प्रयत्न करून हा रस्ता नव्याने करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या रस्त्याच्या विकासासाठी निधी मात्र उपलब्ध करून दिला नाही. त्यामुळे गेल्या चार वर्षापासून हा रस्ता वाहतुकीसाठी सोयीचा नव्हता. माजी आमदार अंजली निंबाळकर यांच्या प्रयत्नातून 5 कोटी रुपये रस्त्याच्या विकासासाठी मंजूर केले होते. यातून फक्त काही ठिकाणी रस्ता दुरुस्त केला आहे. हा रस्ता खानापूर-यल्लापूरशी जोडणारा असून हा रस्ता तालगुप्पा महामार्ग म्हणून घोषित करण्यात आल्यानंतरही या रस्त्याच्या विकासासाठी प्रयत्न करण्यात आलेले नाहीत. गेल्या काहीवर्षापासून रस्त्याची देखभाल न केल्याने रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. या रस्त्यासाठी शासनदरबारी हल्याळचे आमदार आर. व्ही. देशपांडे आणि खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी गांभीर्याने घेऊन या रस्त्याच्या विकासासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

Advertisement

जखमी मासे विक्रेत्याचा मृत्यू

खानापूर-तालगुप्पा राज्य मार्गावरील बेकवाड जवळ रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे दुचाकीवरून पडून जखमी  झाल्याची घटना शुक्रवारी घडली होती. या घटनेतील जखमी भीमाप्पा रामाप्पा भोवी (वय 55) राहणार इटगी यांचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. रविवारी इटगी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. भीमाप्पा भोवी हे व्यवसायाने मासे विक्रेते होते. आपल्या दुचाकीवरून मासे घेऊन ते प्रथम बेकवाड गावात मासे विकून रस्त्याने  दुचाकीवरून पुन्हा बिडीकडे जात होते. खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकीवरून पडून त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्याना अधिक उपचारासाठी हुबळी येथील किम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. उपचाराला प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद नंदगड पोलिसात झाली आहे.

Advertisement
Tags :

.