Sangli News : सांगलीत 'नमो रन मॅरेथॉन 2025' उत्साहात पार
नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त आ. सुधीर गाडगीळ युवा मंचतर्फे उपक्रम
सांगली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आ. सुधीर गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली 'नमो रन मॅरेथॉन २०२५ नशा छोडो, राष्ट्र जोडो' हा उपक्रम सांगली जिल्ह्यात मोठ्या उत्साहात पार पडला. या मॅरेथॉनचे आयोजन आ. सुधीर गाडगीळ युवा मंच, सांगली जिल्हा यांच्या वतीने करण्यात आले होते. जिल्ह्यातील विविध भागांतील १५०० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवत व्यसनमुक्त, निरोगी आणि सशक्त भारत घडविण्याचा संकल्प केला.
'नशा छोडो, राष्ट्र जोडो- स्वस्थ भारत, सशक्त भारत' हा संदेश देत तरुणाईला व्यसनमुक्त जीवनाकडे वळविणे आणि राष्ट्रप्रेम जागविणे, हा या उपक्रमामागचा प्रमुख उद्देश होता. स्पर्धकांनी उत्साह, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट दर्शन घडवत मॅरेथॉन यशस्वीपणे पूर्ण केली. या मॅरेथॉनच्या आयोजनासाठी आ. सुधीर गाडगीळ युवा मंचचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. सर्व बिजेत्यांना रोख रक्कम, शील्ड व प्रमाणपत्र, तर उत्तेजनार्थ आलेल्या स्पर्धकांना शील्ड व प्रमाणपत्र, तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी आ. गाडगीळ म्हणाले, या उपक्रमाच्या माध्यमातून व्यसनमुक्त समाजनिर्मितीचा आणि तरुणांना आरोग्य व राष्ट्रसेवेच्या दिशेने प्रेरित करण्याचा संदेश समाजात पोहोचला. या स्पर्धेसाठी मदत केलेल्या सर्व प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर, पोलीस अधिकारी आणि आयोजकांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.
यावेळी आ.सुधीर गाडगीळ, माजी आ. दिनकर पाटील, भाजपा किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, भाजपचे सरचिटणीस विश्वजीत पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शरद देशमुख, सुनील भोसले, शैलेश पवार, विशाल पवार, शरद नलवडे, युवा मोर्चाचे शांतिनाथ कर्वे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अविनाश मोहिते, उदय मुळे, विजय साळुंखे, नितीन शिंदे, संदीप कुकडे, अतुल माने, गणपत साळुंखे, राहुल नवलाई, अमित देसाई,
विजेते असे...
मुलांमध्ये अनुक्रमे अभिनंदन सूर्यवंशी, आकारा बिरादार, इराप्पा बेळगी, वैभव पवार, साहिल साबळे, सागर शर्मा, ऋषिकेश दादासो सरगर, तुकाराम विजय कुल्लाळकर, प्रतीक मारुती पाटील, श्रीधर कांबळे तर मुलींमध्ये प्रणाली मंडले, तनुजा सोळांदूरकर, ऐश्वर्या धोत्रे, सुमित्रा खंडागळे, आराध्या शिंदे, तर उत्तेजनार्थ आराध्या राजमाने, शीतल पांढरे, सुहाना शेख, मयुरी राणे, अरीफा शेख विजेत्या ठरल्या.
रवींद्र बादवणे, कृष्णा राठोड, संतोष सरगर, सुबराव मद्रासी, तसेच भाजपा व युवा मंचचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.