नम्म बिर्ला, मॅजिक ए, एमएसडीएफ विजयी
बेळगाव : फॅब स्पोर्ट्स क्लब आयोजित धर्ती जीओ पुरस्कृत फॅब चषक 10 वर्षांखालील आंतरक्लब फुटबॉल स्पर्धेत नम्म बिर्ला, मॅजिक ए., एमएसडीएफ ए, नम्मा बिर्ला यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करुन प्रत्येकी दोन गुण मिळविले. वडगाव येथील सीआर-7 स्पोर्ट्स एरिनाच्या टर्फ मैदानावरती खेळविण्यात आलेल्या या फुटबॉल स्पर्धेत पहिल्या सामन्यात एमएसडीएफ ए संघाला मॅजिक ए संघाने शुन्य बरोबरीत रोखले या सामन्यात दोन्ही संघांनी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण त्यांना यश आले नाही. सामना बरोबरीत राहिला.या सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू सात्विक. तर दुसऱ्या सामन्यात नम्म बिर्ला संघाने मॅजिक बी संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे गोलफलक कोराच राहिला. दुसऱ्या सत्रात नम्म बिर्लाच्या अनिकेतच्या पासवरुन आरुशने गोल करुन 1-0 ची आघाडी मिळवून दिली. हाच गोल शेवटी विजयाला कारणीभूत ठरला. आरुशला उत्कृष्ट खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले.
तिसऱ्या सामन्यात मॅजिक ए ने एमएसडीएफ संघाचा 1-0 असा निसटता पराभव केला. सामन्याच्या 13 व्या मिनिटाला ट्रॅविसोने गोल करुन 1-0 अशी आघाडी मिळून दिली. त्याला उकृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. चौथ्या सामन्यात एमएफडीएफ ए संघाने मॅजिक ब संघाचा 3-1 असा पराभव केला. या सामन्यात सातव्या मिनिटाला एमएसडीएफच्या वरुणच्या पासवर विनायकने पहिला गोल केला. तर 14 व्या मिनिटाला विनायकच्या पासवर आयुषने दुसरा गोल करुन 2-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात 21 व्या मिनिटाला मॅजिकच्या आरवने गोल करुन 1-2 अशी आघाडी कमी केली. 23 व्या मिनिटाला वरुणच्या पासवर आयुषने तिसरा गोल करुन एमएसडीएफला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली. ऋषभला उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. पाचव्या सामन्यात नम्म बिर्ला संघाने बिटा संघाचा 1-0 असा पराभव केला. सामन्याच्या 14 व्या मिनिटाला नम्मच्या आरुशने गोल करुन 1-0 ची महत्त्वाची आघाडी मिळवून दिली. या सामन्यात आरुशला उत्कृष्ट खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले.