For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नाव सॅमसुंग अन् नोकरी अॅपल स्टोअरमध्ये

07:00 AM Nov 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
नाव सॅमसुंग अन् नोकरी अॅपल स्टोअरमध्ये
Advertisement

कधीकधी एक नाव तुमची ओळख ठरते. परंतु हेच नाव तुमच्यासाठी संकट ठरले तर. काहीसे 36 वर्षीय सॅमसुंगसोबत घडले आहे. त्याला स्वत:च्या नावामुळे कोंडीला तोंड द्यावे लागले. यामुळे त्याने अखेर स्वत:चे नाव बदलण्याचा निर्णय घेतला. 2012 पासून ही कहाणी सुरू होते. तेव्हा सॅमसुंग नावाच्या या व्यक्तीच्या बिझनेस कार्डचे छायाचित्र ऑनलाइन व्हायरल झाले. प्रत्यक्षात सॅमसुंग हा त्याकाळात अॅपल स्टोअरमध्ये काम करत होता. त्यादरम्यान एका ग्राहकाने त्याचे बिझनेस कार्ड घेतले आणि ते सोशल मीडियावर शेअर केले. एका अॅपल कर्मचाऱ्याचे नाव सॅमसंग असल्याचे कळल्यावर लोकही चकित झाले. अॅपलची प्रतिस्पर्धी कंपनी सॅमसंगशी त्याचे नाव मिळतेजुळते आहे. बिझनेस कार्ड व्हायरल होताच सॅम एका रात्रीत इंटरनेट सेंसेशन ठरला. अशा स्थितीत त्यावेळी 24 वर्षीय असणाऱ्या सॅमने स्वत:चे नाव सॅम स्ट्रूआन करवून घेतले. मी 2013 मध्ये अॅपल स्टोअर सोडले होते.

Advertisement

स्कॉटलंडच्या आइल ऑफ स्कायवर स्थित एका गावाच्या नावामुळे स्ट्रुआन आडनाव निवडल्याचे त्याने सांगितले. बालपणापासून माझ्या सॅम सुंग नावावर थट्टा केली जायची आणि शाळेत फजिती व्हायची. परंतु अॅपल स्टोअरमध्ये काम करताना जे घडले ते वेगळेच होते, असे तो सांगतो. सॅम सुंग अॅपल स्टोअरमध्ये काम करत असताना लोक त्याची चेष्टा करायचे. लोक स्टोअरमध्ये येऊन सॅम सुंग येथेच काम करतो का अशी विचारणा करायचे. त्यादरम्यान मी तो नव्हेच अशाप्रकारे वागायचो. परंतु लोकांना सत्य कळताच ते माझी चेष्टा करू लागायचे, जे मला आवडत नव्हते. अशास्थितीत मी नाव बदलण्याचा निर्णय घेतला. तसेच इंटरनेट प्रसिद्धीमुळे अत्यंत घाबरलो होतो, स्वत:च्या नोकरीवरून चिंता सतावू लागली होती असे तो सांगतो. सॅम आता यशस्वी रिक्रूटमेंट कंसल्टेंट आहे आणि नाव बदलण्याचा निर्णय माझ्या कारकीर्दीसाठी योग्य ठरल्याचे त्याचे सांगणे आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.