बेळगाव रेल्वेस्थानकाला डॉ. शिवबसव महास्वामीजी नाव द्या
खासदार शेट्टर यांची केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांच्याशी चर्चा
बेळगाव : बेळगाव रेल्वेस्थानकाचे डॉ. शिवबसव महास्वामीजी नामकरण करण्याची मागणी खासदार जगदीश शेट्टर यांनी केली आहे. यासंबंधी त्यांनीयांची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव बुधवार दि. 3 डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे भेट घेऊन चर्चा केली. बेळगावातील रेल्वे स्थानकाचे डॉ. शिवबसव महास्वामीजी नामकरण करण्याची स्थानिक रहिवाशांची मागणी आहे. या संदर्भात प्रस्ताव कर्नाटक सरकारमार्फत दिल्ली येथील गृहमंत्रालयाला यापूर्वीच दिला आहे. या मागणीला रेल्वे मंत्रालयाकडूनही संमती मिळाली आहे, अशी माहिती खासदार जगदीश शेट्टर यांनी दिली. याला केंद्रीय मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली. बेळगाव-बेंगळूर दरम्यान धावणारी ‘वंदे भारत रेल्वे’ बेळगावातून पहाटे 5.20 ऐवजी सकाळी 6.15 वा. सोडण्याची व्यवस्था करावी अशी प्रवाशांची मागणी आहे, अशी माहिती खासदार शेट्टर यांनी दिल्यानंतर याबाबत विचार करण्याचे सांगितले. बेंगळूर-बेळगाव-मुंबई सुपरफास्ट रेल्वे सुरू करण्याची मागणीही केली. लोकापूर-रामदुर्ग-सौंदत्ती-धारवाड दरम्यान नूतन रेल्वेमार्ग निर्माणासाठी सर्व्हेक्षणाला त्वरित मंजुरी द्यावी, अशी मागणी केली. यालाही यांनी संमती दिल्याचे पत्रकात म्हटले आहे.