For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यल्लम्मा डोंगरावर महायज्ञ सोहळा

01:13 PM Dec 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
यल्लम्मा डोंगरावर महायज्ञ सोहळा
Advertisement

कंकण मंगळसूत्र विसर्जन विधीनिमित्त होमहवन

Advertisement

वार्ताहर/सौंदत्ती

‘उदं ग आई उदं’च्या गजर व भंडाऱ्याच्या उधळणीत कर्नाटक,महाराष्ट्र व गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीच्या कंकण मंगळसूत्र विधी सोहळ्यानिमित गुऊवारी आयोजित केलेला महायज्ञ सोहळा विधीपूर्वक संपन्न झाला. यावेळी पालखी मिरवणूक पार पडली.

Advertisement

पालखी मिरवणूक 

बुधवारी रात्री व गुरूवारी उत्सव मूर्तीसह पालखी मिरवणूक काढण्यात आली. सदर मिरवणूक मौनेश्वर मंदिरापर्यंत नेण्यात आली. त्या ठिकाणी ‘उदं ग आई उदं’च्या जयघोषात कंकण मंगळसूत्र विसर्जनाचा विधी पार पाडला. यावेळी यल्लम्मा देवीचे माहेरघर हरळकट्टी येथून भाविकांनी हिरवी साडी, चोळी आदी साहित्य आणून कंकणमंगळसूत्र विधीपूर्वक पार पडला. यावेळी भाविकांनी ढोल-ताशांच्या गजरात व भंडाऱ्याची उधळण केली. गुरूवारी सकाळी मंदिर विकास प्राधिकरण कार्यदर्शी  अशोक दुरगुंटी, सौंदत्तीचे तहसीलदार मल्लिकार्जुन हेग्गनावर, उपकार्यदर्शी नागरत्ना चोळीन, सीपीआय सुरेश बी., अल्लमप्रभू प्रभूनवर, अर्चक यडूरय्या उपस्थित होते. यल्लम्मा मंदिरात सकाळी होमहवन विधीपूर्वक पार पडला.

वाहतूक विस्कळीत 

डोंगरावर गेल्या चार दिवसांपासून विविध भागातून आलेल्या चारशेहून अधिक  विविध राज्य परिवहन बसेस मिळेल त्याठिकाणी उभ्या केल्याने वाहतूक काशंडी झाली होती. उगरगोळ जोगुळभावी आणि सौंदती मार्गावर वाहनांची कोंडी झाली होती. उगरगोळ-सौंदत्ती मार्गावर राज्य परिवहनच्या बसेस थांबल्याने या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची कोंडी झाली. पोलीस व वाहनचालकांमध्ये शाब्दिक चकमकी ठिकठिकाणी उडाल्या. अखेर सीपीआय सुरेश बी. व पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली.

Advertisement
Tags :

.