महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नामा म्हणे केशव ठाव देईल वैंकुठी!!

12:49 PM Nov 04, 2022 IST | Rohit Salunke
Advertisement

बेळगाव - दशमी एक व्रत करा दिंडी दर्शन। एकादशी उपवास तुम्ही जागा जागरण !!
द्वादशी साधन कोटीकुळे उध्दरती। नामा म्हणे केशव ठाव देईल वैंकुठी !!

Advertisement

आज कार्तिकी एकादशी, निमित्त शहापूर विठ्ठलदेव गल्ली बेळगाव येथील श्री नामदेव विठ्ठल मंदिरात आज एकादशी तसेच संत शिरोमणी नामदेव महाराजांची ७५२ वी जयंती साजरी करण्यात येत आहे. प्रारंभी पहाटे विठ्ठलाला काकड आरतीने सुरुवात करून दुग्धाभिषेक आरती भजनाने उत्सवला प्रारंभ करण्यात आले..
नंतर श्री नामदेव जयंती निमित्त नामदेव महाराजांच्या मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
सायंकाळी ४वाजता नामदेव महिलां भजनी मंडळाच्या वतीने भजन तसेच रात्री ७ ते ८.३० वाजेपर्यंत हरिपाठाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी संपूर्ण मंदिर परिसराला आकर्षकरित्या सजविण्यात आले आहे. प्रसंगी श्री नामदेव दैवकी संस्था अध्यक्ष, कार्यकारणी मंडळाचे सदस्य तसेच शिंपी समाज बांधवआणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#752nd birth anniversary of Namdev Maharaj#Kartiki Ekadashi#Shahapur Vitthaldev Galli Belgaum#socailmedia#tarunbharat
Next Article