महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

तैवान स्पर्धेत नयना जेम्सला सुवर्ण

06:21 AM Jun 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

तैवान खुल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताची अव्वल महिला अॅथलिट नयना जेम्सने महिलांच्या लांब उडी प्रकारात 6.43 मी. चे अंतर नोंदवित सुवर्णपदक पटकाविले.

Advertisement

या स्पर्धेत महिलांच्या लांब उडीत 28 वर्षीय नयनाने आपल्या तिसऱ्या प्रयत्नात ही सर्वोत्तम कामगिरी नोंदविली. या स्पर्धेवेळी पावसाचा अडथळा वारंवार आला होता. गेल्या मार्चमध्ये झालेल्या इंडियन खुल्या अॅथलेटिक्स स्पर्धेत नयना जेम्सने महिलांच्या लांब उडीत 6.67 मी. ची सर्वोत्तम कामगिरी केली होती. तसेच तिने गेल्या महिन्यात झालेल्या फेडरेशन चषक अॅथलेटिक्स स्पर्धेत महिलांच्या लांब उडीत सुवर्णपदक पटकाविताना 6.53 मी. चे अंतर नोंदविले.

स्पेनमधील झालेल्या स्पर्धेत पुरुषांच्या 200 मी. धावण्याच्या शर्यतीत भारताचा धावपटू अनिमेश कुजूरने सुवर्णपदक पटकाविताना 20.59 सेकंदाचा अवधी घेतला. भुवनेश्वरमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या फेडरेशन चषक अॅथलेटिक्स स्पर्धेत त्याने या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक मिळविले होते. स्पेनमधील स्पर्धेत पुरुषांच्या 200 मी. धावण्याच्या शर्यतीत स्पेनच्या डॅनियल सिरेनोने 20.85 सेकंदाचा अवधी घेत रौप्यपदक तर लोपेजने कांस्यपदक मिळविले. फ्रान्समध्ये झालेल्या विश्व अॅथलेटिक्स संघटनेच्या ड कॅटेगरीमधील स्पर्धेत राष्ट्रकुल स्पर्धेतील तिहेरी उडीत सुवर्णपदक मिळविणारा पॉलने सुवर्णपदक पटकाविले.

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media
Next Article