For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नैला ग्रेवालला मिळाला चित्रपट

06:07 AM Jun 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
नैला ग्रेवालला मिळाला चित्रपट
Advertisement

वेबसीरिजमुळे मिळाली ओळख

Advertisement

हिंदी चित्रपटसृष्टीत उदयोन्मुख कलाकार स्वत:च्या अभिनयाद्वारे छाप पाडताना दिसून येतात. सद्यकाळात अभिनेत्री नैला ग्रेवाल ‘मामला लीगल है’ या वेबसीरिजमुळे चर्चेत आली आहे. या सीरिजमधील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले आहे. नैलाने बॉलिवूडशी निगडित कुठलीच पार्श्वभूमी नसल्याने येथे स्थान निर्माण करणे आव्हानात्मक ठरल्याचे म्हटले आहे.

शालेय शिक्षण संपल्यावर ‘तमाशा’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी अपयश आणि यशामुळे फरक पडत नव्हता. येथे प्रत्येक गोष्ट मनाला लावून घ्यायची नसते हे काम करत करत समजल्याचे ती सांगते.

Advertisement

मामला लीगल है या वेबसीरिजचा दुसरा सीझन देखील निर्माण केला जात आहे. तेच इश्क विष्क रीबाउंड हा तिचा चित्रपटही यंदा प्रदर्शित होणार आहे. सेटवर असणेच माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. काम करताना माझ्यामध्ये एक कलाकार असल्याचे वाटू लागले होते. केवळ हिरोईन किंवा ग्लॅमरस भूमिकांमध्ये मला रुची नाही. आता अभिनेत्रींसाठी चांगल्या भूमिका लिहिल्या जात आहेत. वैविध्यपूर्ण भूमिका साकारण्याची इच्छा असल्याचे नैला सांगते.

‘इश्क विश्क’ हा चित्रपट 2003 मध्ये प्रदर्शित झाला होता, तेव्हा त्याची गाणी टीव्हीवर पाहून मी नाचायचे. शाहिद कपूरने त्या चित्रपटातून पदार्पण केले होते. आता तो बॉलिवूडचा स्टार झाला असल्याचे पाहून हिंमत वाढते. मी देखील याच्या सीक्वेलद्वारे कारकीर्दीत बदल घडवून आणू शकेन अशी अपेक्षा आहे. इश्क विश्क रीबाउंड या चित्रपटात सध्याच्या काळातील प्रेम आणि मैत्री पहायला मिळणार असल्याचे नैला सांगते.

Advertisement
Tags :

.