For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नायब सैनीच होणार हरियाणाचे मुख्यमंत्री

10:44 PM Oct 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
नायब सैनीच होणार हरियाणाचे मुख्यमंत्री
**EDS: IMAGE VIA @AmitShah ON WEDNESDAY, OCT 16, 2024** Panchkula: Union Minister Amit Shah greets Nayab Singh Saini after he was unanimously elected as BJP's legislature party leader in Haryana, in Panchkula, Haryana. (PTI Photo)(PTI10_16_2024_000187B)
Advertisement

अमित शाह यांच्या उपस्थितीत नाव जाहीर, सरकार स्थापनेचा दावा, आज शपथ घेणार

Advertisement

वृत्तसंस्था/ चंदीगड

नायबसिंग सैनी हे हरियाणाचे नवे मुख्यमंत्री होण्यावर बुधवारी शिक्कामोर्तब झाले. भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नायबसिंग सैनी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. भाजप नेते अनिल विज यांनी यापूर्वी आपणही मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असल्याचा दावा केल्याने अंतिम क्षणापर्यंत कार्यकर्त्यांना ‘मुख्यमंत्री कोण होणार?’ याची उत्सुकता लागून राहिली होती. मात्र, आता नायबसिंग सैनी गुरुवारी होणाऱ्या सोहळ्यामध्ये पंचकुलामध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार हे निश्चित झाले आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रातील वरिष्ठ नेते आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत.

Advertisement

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अनिल विज आणि मनोहरलाल खट्टर यांनी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून नायबसिंग सैनी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला सर्व आमदारांनी पाठिंबा दिला. भाजपने विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती केली होती.

केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर दुपारी 2 वाजता ते राज्यपालांना भेटण्यासाठी राजभवनात पोहोचले. याप्रसंगी त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला. नायबसिंग सैनी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर, राजस्थानचे मुख्यमंत्री मोहन यादव, निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान, सतीश पुनिया, बिप्लब देव, सुरेंद्र नागर आणि भाजपचे इतर वरिष्ठ नेते याप्रसंगी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.