महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शहरात नागपंचमी भक्तिभावाने

11:57 AM Aug 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नागदेवतेची पूजा करून दूध-लाह्यांचा दाखविला नैवेद्य : पारंपरिक पद्धतीने वारुळाचे पूजन 

Advertisement

बेळगाव : शहर व उपनगरात शुक्रवारी नागपंचमीचा सण भक्तिभावाने उत्साहात साजरा करण्यात आला. घरोघरी नागमूर्ती आणून पूजन करण्यात आले. नागदेवतेची पूजा करून दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखविण्यात आला. बाजारात गुरुवारी नागपंचमीचे साहित्य आणि नागमूर्तीची खरेदी झाली होती. शुक्रवारी सकाळपासून बालचमुंसह नागरिकांची नागमूर्ती आणण्यासाठी लगबग पाहावयास मिळाली. काही ठिकाणी गुरुवारीच नागमूर्तीचे आगमन झाले होते. तर पारंपरिक पद्धतीने वारूळ आणि नागदेवतेचे पूजन करण्यात आले. यामुळे बालचमू आणि नागरिकांमध्ये उत्साह पहावयास मिळाला. त्याबरोबर नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर काही मंदिरातून विशेष पूजा करण्यात आली. मूर्तींवर आरास करून सजविण्यात आले होते. भाविकांनीही सकाळपासून दर्शनाला सुरूवात केली होती.

Advertisement

ग्रामीण भागातही नागपंचमी 

ग्रामीण भागातही नागपंचमी भक्तिभावाने साजरी करण्यात आली. नागाला देव मानून पूजा करण्याची परपंरा जपण्यात आली. शेतातील उंदरांचा नाश करणाऱ्या सांपाना शेतकऱ्याचा मित्र मानला जातो. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी शेतात जाऊन पूजन केले आहे. विशेषत: ग्रामीण भागात फराळ आणि पोह्यांच्या लाडूची परंपरा कायम आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article