कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नागनाथ, गोकाक, मराठा स्पोर्ट्स ग्रामीण, पुनीत यांची विजयी सलामी

06:05 AM May 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

भातकांडे स्पोर्ट्स अकादमी, बेळगाव जिल्हा वाल्मिकी समाज व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या संयुक्त विद्यमाने सतीश जारकीहोळी चषक राज्यस्तरीय टेनिसबॉल स्पर्धेत उद्घाटन दिवशी नागनाथ इलेव्हनने पोलीस संघाचा, मराठा स्पोर्ट्स ग्रामीणने कांतारा बॉईजचा, गोकाक स्ट्रायकरने एस.के. लायन्सचा, पराभव करुन पुढील फेरीत प्रवेश केला. ज्ञानेश्वर, संकेत, अत्तु यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आले.

Advertisement

सरदार्स मैदानावरती स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉ. मोहम्मद रोशन, बेळगाव पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग, जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, परशराम दुडगनट्टी, वाल्मिकी समजाचे अध्यक्ष राजशेखर तलवार, भातकांडे स्पोर्ट्स अकादमीचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे, सौम्या नाईक, पांडुरंग नाईक, अशोक नाईक, मंजुनाथ पाच्छापुर, दिनेश बागडी, बसवराज दोडमनी, रुपेश पावले, प्रवीण पाटील, मिलिंद चव्हाण, प्रणय शेट्टी, नासीर पठाणसह अन्य मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते यष्टीचे पूजन करुन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

उद्घाटनाच्या सामन्यात पोलीस संघाने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 8 षटकात 8 गडी बाद 62 धावा केल्या. त्यात संतोषने 13 तर प्रवीणने 10 धावा केल्या. नागनाथतर्फे साईशने 2 तर संतोषने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना नागनाथने 7.4 षटकात 5 गडी बाद 63 धावा करुन सामना 5 गड्यांनी जिंकला. त्यात रमेश चौगुलेने 3 चौकारासह 22 धावा केल्या. पोलीसतर्फे ज्ञानेश्वरने 2 गडी बाद केले.

दुसऱ्या सामन्यात कांतारा बॉईजने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 8 गडी बाद 48 धावा केल्या. त्यात प्रकाश जाधव व रवीकिरणने प्रत्येकी 10 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना मराठा स्पोर्ट्स ग्रामीणने 5.1 षटकात 2 गडी बाद 50 धावा करुन सामना 8 गड्यांनी जिंकला. अभिजीत के.ने  3 चौकारांसह 20, उमेशने 1 षटकार 1 चौकारासह 14 धावा केल्या. कांतारातर्फे रवीकिरण व प्रणीत यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

तिसऱ्या सामन्यात गोकाक स्ट्रायकर्सने प्रथम फलांदाजी करताना 8 षटकात 5 गडी बाद 97 धावा केल्या. अत्तु एच.ने 5 षटकार 2 चौकारांसह 21 चेंडूत 47, जमीर सौंदत्तीने 3 चौकारांसह 25 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना एस.के.लायन्स, बाळेकुंद्री संघाचा डाव 7.5 षटकात 62 धावांत आटोपला. त्यात अंजीरने 1 षटकार 3 चौकारासह 23 तर लल्लाने 11 धावा केल्या.

चौथ्या सामन्यात डॉ. पुनीत इलेव्हन संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 6 गडी बाद 93 धावा केल्या. त्यात नामदेव गुरवने 4 षटकार 1 चौकारासह 32, शाहू पाटीलने 1 षटकार 3 चौकारासह 27, समीरने 13 तर मॅक्स्वेल इम्तियाजने 12 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना आदर्श इलेव्हन संघाने 8 षटकात 7 गडी बाद 71 धावाच केल्या. त्यात महेश डेळेकरने 21, अनिकेत धामणेकरने 17 तर शेरीने 16 धावा केल्या.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article