नागेश चोरलेकर जय भारत क्लासिकचा मानकरी
खानापूरचा सिद्धार्थ गावडे उत्कृष्ट पोझर
बेळगाव : जय भारत फौंडेशन आयोजित जय भारत क्लासिक बेळगाव जिल्हा ग्रामीण मर्यादित जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत खानापूरच्या नागेश चोरलेकरने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर जय भारत क्लासिक किताब पटकाविला. तर सिद्धार्थ गावडेने उत्कृष्ट पोझरचा बहुमान मिळविला. रामनाथ मंगलकार्यालय येथे घेण्यात आलेल्या जय भारत क्लासिक बेळगाव जिल्हा ग्रामीण विभागीय शरीरसौष्ठव स्पर्धेत जवळपास 100 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता.
निकाल पुढीलप्रमाणे-
55 किलो गट 1) कृष्णा हिरोजी- कंग्राळी, 2) विनायक पन्नूर-गोकाक, 3) पांडुरंग गुरव-खानापूर, 4) विशाल साहनी-कंग्राळी के. एच., 5) सुनील गुंजल खानापूर.
60 किलो गट 1) जोतिबा पाटील-सावगांव, 2) ओमकार गवस-कंग्राळी, 3) अक्षय मुतगेकर-कणबर्गी, 4) ओमकार मिराशी-खानापूर, 5) कल्पेश कुंडेकर -येळ्ळूर.
65 किलो गट 1) नागेश चोरलेकर-खानापूर, 2) तुषार गावडे-हिंडलगा, 3) ऋषभ गोवेकर-हलगा, 4) फुर्कान तुरमुरी-खानापूर, 5) ओमकार येळवी-मास्कोनहट्टी.
70 किलो गट 1) युवराज राक्षे-आंबेवाडी, 2) अनिल भोवरा-खानापूर, 3) गजानन कल्लापूर-खानापूर, 4) निरंजन पाटील-निपाणी, 5) सतीश जाधव- खानापूर.
75 किलो गट 1) संतोष अणवेकर खानापूर 2) आकाश लोहार हिंडलगा 3) शाम राजगोळकर पिरनवाडी 4) पंकज गुरव हिंडलगा 5) महेश मुलात्ती खानापूर.
75 वरील गट 1) दिग्विजय पाटील-खानापूर, 2) हर्षद पाटील-हिंडलगा, 3) योगेश पाटील-कंग्राळी, 4) रोहन केसरकर-हिंडलगा 5) शामसुंदर वाटलेकर-खानापूर.
जय भारत किताबासाठी कृष्णा हिरोजी, जोतिबा पाटील, नागेश चोरलेकर, युवराज राक्षे, संतोष अणवेकर, दिग्विजय पाटील यांच्यात लढत झाली. यामध्ये नागेश चोरलेकर, युवराज राक्षे व दिग्विजय पाटील यांच्या तुलनात्मक लढत झाली. त्यामध्ये खानापूरच्या नागेश चोरलेकरने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर जय भारत क्लासिक हा मानाचा किताब पटकाविला. तर खानापूरच्याच सिद्धार्थ गावडेने उत्कृष्ट पोझर हा किताब पटकाविला. या स्पर्धेसाठी पंच म्हणून राजेश लोहार, रणजीत किल्लेकर, अनिल अंब्रोळे, श्रीधर बारटक्के, जितेंद्र काकतीकर, नागेंद्र मडिवाळ, विजय चौगुले, भारत बाळेकुंद्री, सुनील चौधरी, नारायण चौगुले, बाबू पावशे, संतोष सुतार, सुनील बोकडे यांनी काम पाहिले तर स्टेज मार्शल दीपक कित्तूरकर, राजेश पाटील, सोमनाथ हलगेकर यांनी काम पाहिले.