महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नागेंद्र यांना पाच दिवसांची ईडी कोठडी

06:11 AM Jul 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लोकप्रतिनिधी न्यायालयाचा आदेश : 18 जुलै रोजी पुन्हा हजर करण्याचे निर्देश

Advertisement

प्रतिनिधी/बेंगळूर

Advertisement

महर्षि वाल्मिकी विकास निगममधील कोट्यावधी ऊपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी माजी मंत्री बी. नागेंद्र यांना 5 दिवसांसाठी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत सोपवण्याचा आदेश लोकप्रतिनिधी न्यायालयाने शनिवारी दिला. या गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी नागेंद्र यांच्या घरांवर छापे टाकून त्यांना ताब्यात घेतले होते. अधिकाऱ्यांनी नागेंद्र यांना बेंगळुरातील डॉलर्स कॉलनी येथील निवासस्थानातून शांतीनगर येथील ईडी कार्यालयात नेऊन दीर्घ चौकशीनंतर अटक केली होती.

शनिवारी नागेंद्र यांना लोकप्रतिनिधींच्या न्यायालयाचे न्यायाधीश संतोष गजानन भट्ट यांच्यासमोर हजर करण्यात आले. नागेंद्र हे संबंधित खात्याचे मंत्री असल्याने त्यांची अधिक चौकशी करण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांना 14 दिवसांची कोठडी देण्याची विनंती सरकारी वकिलाने न्यायाधीशांकडे केली. मात्र, न्यायाधीश संतोष गजानन भट यांनी ईडीच्या वकिलांची मागणी फेटाळून लावत नागेंद्र यांना 5 दिवसांची ईडी कोठडी सुनावली. 18 जुलै रोजी सकाळी 11 वाजता पुन्हा हजर करण्याचे निर्देश दिले.

दरम्यान, न्यायाधीशांसमोर आमदार नागेंद्र यांनी आपल्याला उच्च रक्तदाब आणि थकवा असल्याचा दावा केला. त्यामुळे न्यायाधीशांनी हे मान्य करून नागेंद्र यांची दररोज 3 तास चौकशी करावी. चौकशीनंतर 30 मिनिटे विश्र्रांती द्यावी. तसेच त्यांची दररोज वैद्यकीय तपासणी करण्याची सूचना न्यायाधीशांनी केली.

दररोज आरोग्य तपासणीची सूचना

न्यायाधीशांसमोर नागेंद्र म्हणाले की, या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. हे निगमच्या बैठकीद्वारे पैसे ट्रान्सफर करण्यात आले आहे. मी खात्याचा मंत्री होतो. मात्र, बेकायदेशीरपणे झालेल्या पैसे हस्तांतरणाची माहिती आपल्याला नाही. मला आरोग्याची समस्या असून वैद्यकीय मदतीची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर नागेंद्र यांना दर 24 तासांनी आरोग्य तपासणीसाठी घेऊन जावे, अशी सूचना न्यायाधीशांनी केली. नागेंद्र यांना गुरुवारी सकाळी ताब्यात घेतलेल्या अधिकाऱ्यांनी घराची आणि कार्यालयाची 40 तास झडती घेतली आहे.

आमदार दद्दल यांना अटकेची भीती

रायचूर ग्रामीणचे आमदार, निगमचे अध्यक्ष बसनगौडा दद्दल यांनाही या गैरव्यवहारप्रकरणी अटकेची भीती आहे. माजी मंत्री बी. नागेंद्र यांच्या अटकेनंतर दद्दल यांच्या अटकेचीही शक्मयता बळावली आहे. तसेच त्यांनी मुलगा त्रिशूल नायक याच्या नावे 4 एकर 31 गुंठे जमीन खरेदी केली आहे. वाल्मिकी विकास निगममधील गैरव्यवहारदरम्यानच त्यांनी ही जमीन खरेदी केल्याचे बोलले जात आहे.

आमदार बसनगौडा दद्दल गुरुवारी एसआयटी अधिकाऱ्यांसमोर चौकशीसाठी हजर झाले होते. आता दद्दल अज्ञातस्थळी रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ते बेंगळूरमधील आपल्या निवासस्थानीही पोहोचलेले नाहीत. आपल्या कुटुंबियांसह ते अज्ञात ठिकाणी गेले असून यलहंका येथील कोगिलूजवळील दद्दल व्हिलामध्ये फक्त दोन घरकाम करणारे कर्मचारी आहेत. मात्र ते परत कधी येणार याची माहिती उपलब्ध नाही. या गैरव्यवहाराप्रकरणी ईडीकडून अटकेचा धोका असलेल्या दद्दल यांनी गुरुवारी एसआयटीला अटक करण्याची विनंती केली होती. ईडीच्या अटकेपासून टाळण्याच्या उद्देशाने त्यांनी ही रणनीती आखल्याचे समजते. मात्र, एसआयटीने त्यांना अटक केलेली नाही. आता ते अज्ञातस्थळी गेल्याने संशय बळावला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article