नागलला मिळाला चीनचा व्हिसा
06:15 AM Nov 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
Advertisement
24 नोव्हेंबरपासून चेंगडू (चीन) येथे होणाऱ्या ऑस्ट्रेलियन खुल्या प्ले ऑफ लढतीसाठी भारताचा अव्वल टेनिसपटू 27 वर्षीय सुमित नागलला चीनचा प्रवास करण्यासाठी आवश्यक असलेल्या व्हिसा अखेर मिळाला आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी हरियाणाच्या सुमित नागलने यापूर्वीच चीनच्या वकिलातीकडे व्हिसासाठी अर्ज पाठविला होता. पण चीनच्या वकिलातीकडून कोणतेही कारण न देताना नागलचा व्हिसा नाकारला होता. त्यानंतर चीनच्या विदेशी मंत्रालयाकडून या स्पर्धेसाठी चीनमध्ये येणाऱ्या विविध देशांच्या खेळाडूंकरिता तातडीने व्हिसा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला. एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत सुमित नागल हा 275 व्या स्थानावर आहे. गेल्या वर्षी नागलने ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविले होते.
Advertisement
Advertisement