सुपरनॅचरल चित्रपटात दिसणार नागा चैतन्य
दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य यापूर्वी ‘धूता’ या चित्रपटात दिसून आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. या हॉरर चित्रपटानंतर नागा आणखी एका हॉरटर चित्रपटाची तयारी करत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन कार्तिक वर्मा दंडू करणार आहेत.
हा चित्रपट सुपरनॅचरल थ्रिलर धाटणीचा असणार आहे. या चित्रपटाची निर्मिती अर्का मीडिया वर्क्सकडून केली जाणार आहे. याचे चित्रिकरण मे महिन्यानंतर सुरू होणार आहे. नागा चैतन्य अलिकडेच अभिनेत्री शोभिता धुलिपालासोबत विवाहबद्ध झाला आहे. नागा लवकच ‘थंडेल’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सई पल्लवी ही दिग्गज अभिनेत्री दिसून येणार आहे. नागा चैतन्य या चित्रपटात मच्छिमाराच्या भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या निर्मितीकरता 60 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हा चित्रपट 7 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.