For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नागा चैतन्य अन् शोभिताची झाली एंगेजमेंट

07:00 AM Aug 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
नागा चैतन्य अन् शोभिताची झाली एंगेजमेंट
Advertisement

नागा चैतन्य आणि शोभिता धूलिपाला यांनी अखेर साखरपुडा केला आहे. या जोडप्याने गुरुवारी परस्परांना अंगठी घालत नव्या नात्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. यानंतर नागा चैतन्यचे पिता सुपरस्टार नागार्जुन यांनी दोघांच्या साखरपुड्याची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करत दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. नागा चैतन्य आणि शोभिता यांच्या साखरपुड्याची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. आमच्या परिवारात तिचे स्वागत करतानाही आम्ही अत्यंत आनंदी आहोत. त्यांना आयुष्यभर प्रेम अन् आनंद मिळावा अशी प्रार्थना करतो असे नागार्जुन यांनी नमूद केले आहे. नागा चैतन्य आणि शोभिता यांच्या डेटिंगबद्दल दीर्घकाळापासून चर्चा सुरू होती. शोभिता देखील अभिनयक्षेत्रात कार्यरत आहे. शोभिताने बॉलिवूडमध्ये देखील स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. नागा चैतन्यचा पहिला विवाह समांथा रुथ प्रभूसोबत झाला होता. 2017 मध्ये विवाहबंधनात अडकण्यापूर्वी दोघांनी काही वर्षांपर्यंत परस्परांना डेट केले होते. तर ऑक्टोबर 2021 मध्ये दोघांनी विभक्त होण्याची घोषणा केली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.