For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हिजबुल्लाह प्रमुखपदी नईम कासिम

06:14 AM Oct 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
हिजबुल्लाह प्रमुखपदी नईम कासिम
Advertisement

इस्रायलसोबत सुरू आहे संघर्ष

Advertisement

वृत्तसंस्था/ बैरुत

इस्रायलसोबत संघर्ष सुरू असताना हिजबुल्लाहने नव्या प्रमुखाची घोषणा केली आहे. हिजबुल्लाहने मंगळवारी नईम कासिम याची प्रमुखपदी निवड करण्यात आल्याचे सांगितले आहे. तर दुसरीकडे हिजबुल्लाहने मंगळवारी उत्तर इस्रायलच्या दिशेने डागलेल्या रॉकेटमुळे अनेक जण जखमी झाले आहेत.

Advertisement

नईम कासिम हा संघटनेच्या मूळ तत्वांसाठी प्रतिबद्ध आहे. याचमुळे त्याची या पदासाठी निवड करण्यात आली असल्याचे हिजबुल्लाहने वक्तव्य जारी करत म्हटले आहे. 71 वर्षीय नईम कासिम हे यापूर्वी हिजबुल्लाहचे दुसऱ्या क्रमांकाचे कमांडर होते. 1980 च्या प्रारंभी अब्बास अल-मौसौई, सुभी अल-तुफैली आणि हसन नसरल्लाह समवेत या समुहाची स्थापना करणाऱ्या धार्मिक स्कॉलर्सपैकी ते एक आहेत.

युद्धविरामाचे आवाहन

चालू महिन्याच्या प्रारंभी कासिमने लेबनॉनमध्ये युद्धविरामाचे आवाहन केले होते. हिजबुल्लाहने इस्रायलमध्ये आणखी अधिक भयावह हल्ले करण्याची स्वत:ची रणनीति बदलली असल्याचे त्याने स्पष्ट केले होते. मागील महिन्यात बैरूतमध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्लाहचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात हिजबुल्लाहचे अनेक मोठे नेते मारले गेले होते.

नईम कासिम कोण?

नईम कासिमचा जन्म दक्षिण लेबनॉनच्या नबातियेह प्रांतातील कफर किला गावात झाला होता. कासिम हा हिजबुल्लाहच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे. कासिमने 1970 मध्ये लेबनॉन विद्यापीठातून रसायनशास्त्रात पदवी मिळविली होती. 1974-88 पर्यंत तो असोसिएशन फॉर इस्लामिक धार्मिक शिक्षणाचा प्रमुख होता आणि लेबनॉनच्या मुस्लीम विद्यार्थ्यांच्या संघटनेचा संस्थापक सदस्यही आहे.

Advertisement
Tags :

.