For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

टी-20 अष्टपैलूंत नबीची अग्रस्थानी झेप

06:22 AM Jun 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
टी 20 अष्टपैलूंत नबीची अग्रस्थानी झेप
Advertisement

आयसीसी मानांकन : फलंदाजांत सूर्यकुमारचे अग्रस्थान कायम

Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई

अफगाणचा अष्टपैलू मोहम्मद नबी टी-20 अष्टपैलूंच्या मानांकनात अग्रस्थानी पोहोचला असून भारताचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवने फलंदाजीतील अग्रस्थान कायम राखले आहे. आयसीसीने बुधवारी टी-20 ची ताजी क्रमवारी जाहीर केली.

Advertisement

सध्या सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत अफगाण संघ आतापर्यंत अपराजित राहिला आहे. त्यांनी युगांडा व बलाढ्या न्यूझीलंड संघाला पराभवाचा धक्का देत क गटात आघाडीचे स्थान घेतले आहे. नबी हा त्यांचा स्टार परफॉर्मर राहिला असून त्याने फलंदाजी व गोलंदाजी दोन्हीत चमकदार प्रदर्शन केले आहे. 39 वर्षीय नबीने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात दोन बळी मिळविले. त्याने दोन स्थानांची प्रगती करीत अग्रस्थानी झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्कस स्टोइनिसनेही तीन स्थानांची प्रगती करीत दुसरे स्थान पटकावले आहे. याआधी अग्रस्थानावर असणाऱ्या बांगलादेशच्या शकिब अल हसनची घसरण झाली असून तो पाचव्या स्थानावर फेकला गेला आहे.

टी-20 फलंदाजांमध्ये सूर्यकुमारने अग्रस्थान राखले आहे तर त्यांचा सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाज 12 व्या स्थानावर पोहोचला आहे. आजवरचे त्याचे हे सर्वोच्च मानांकन आहे. त्याने वर्ल्ड कपमध्ये दोन सामन्यात 156 धावा जमवित आघाडीचे स्थान घेतले आहे. पाकचा कर्णधार बाबर आझम तिसऱ्या स्थानावर तर इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने पाचवे स्थान निश्चित केले आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने टॉप टेनमध्ये प्रवेश केला असून तो सात स्थानांची प्रगती करीत दहाव्या स्थानावर विसावला आहे.

टी-20 गोलंदाजांत इंग्लंडचा आदिल रशीद अग्रस्थानी, लंकेचा हसरंगा दुसऱ्या स्थानावर आहे. अफगाणची जोडगोळी रशिद खान व फझलहक फारुकी अनुक्रमे तिसऱ्या व चौथ्या स्थानावर पोहोचले आहेत. द.आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज अॅन्रिच नॉर्त्जेनेही फारुकीइतकेच गुण मिळवित चौथे स्थान मिळविले आहे. रशिद खानने वर्ल्ड कप स्पर्धेत सहा तर फारुकीने सर्वाधिक 9 बळी मिळविले आहेत. याशिवाय नॉर्त्जेने 8 बळी टिपले आहेत. बांगलादेशचे मुस्तफिजुर रेहमान, तस्किन अहमद, रिशाद हुसेन यांनीही प्रभावी कामगिरी करीत 13, 19 व 30 वे स्थान मिळविले आहे.

Advertisement
Tags :

.