एन श्रीनिवासन यांनी इंडिया सिमेंट्सचे सीईओपद सोडले
मुलगी आणि पत्नीने देखील संचालक मंडळाचा राजीनामा दिला : अल्ट्राटेकने इंडिया सिमेंट्समधील 32 टक्के हिस्सा खरेदी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
एन श्रीनिवासन यांनी इंडिया सिमेंट्सच्या एमडी आणि सीईओ पदाचा राजीनामा दिला आहे. आदित्य बिर्ला समूहाची कंपनी अल्ट्राटेकच्या इंडिया सिमेंट्समधील प्रवर्तकांचे 32.72 टक्के हिस्सेदारी (10.13 कोटी शेअर्स) पूर्ण केल्यानंतर श्रीनिवासन यांनी पद सोडले आहे.
श्रीनिवासन यांच्यासह अन्य काही प्रवर्तकांनीही राजीनामे दिले आहेत. अधिग्रहणानंतर, अल्ट्राटेकचा इंडिया सिमेंटमधील एकूण हिस्सा 55.49 टक्के (17.19 कोटी समभाग) वाढला आहे. या करारापूर्वी, अल्ट्राटेकचा इंडिया सिमेंटमध्ये 22.77 टक्के (7.05 कोटी हिस्सा) हिस्सा होता.मागील आठवड्यात, भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) 7,000 कोटी रुपयांच्या या कराराला मंजुरी दिली. या संपादनानंतर, 24 डिसेंबर 2024 पासून इंडिया सिमेंट ही अल्ट्राटेक सिमेंटची उपकंपनी बनली आहे. एन श्रीनिवासन, पत्नी चित्रा आणि मुलगी रूपा गुरुनाथ यांनी बोर्डात संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. आर्थिक सेवा ट्रस्ट सिक्युरिटीज सर्व्हिसेस ट्रस्ट आणि चेन्नई सुपर किंग्ज लिमिटेड अल्ट्राटेक आणखी 26 टक्के स्टेक खरेदी करू शकत.
सीसीआयने अल्ट्राटेक सिमेंटला खुल्या ऑफरद्वारे इंडिया सिमेंट्सच्या पेड-अप इक्विटी शेअर भांडवलाच्या 26 टक्के पर्यंत संपादन करण्यास मान्यता दिली आहे. अल्ट्राटेक भारतात ग्रे सिमेंट, व्हाईट सिमेंट, रेडी-मिक्स काँक्रीट, क्लिंकर आणि बिल्डिंग उत्पादने बनवते आणि विकते.
अल्ट्राटेक समभाग 13 टक्के वाढले
अल्ट्राटेकचे शेअर्स एका वर्षात 13.39 टक्क्यांनी वाढले. मंगळवारी अल्ट्राटेक सिमेंटचा समभाग 0.98 टक्केनी घसरून 11,360 वर बंद झाला. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअरमध्ये 0.85 टक्क्यांनी घसरण झाली आहे. तर, गेल्या 6 महिन्यांत 4.74 टक्के आणि एका वर्षात 13.39 टक्केचा सकारात्मक परतावा दिला आहे.
नाव श्रेणी
एन श्रीनिवासन व्यवस्थापकीय संचालक
रूपा गुरुनाथ पूर्णवेळ संचालक
चित्रा श्रीनिवासन बिगर स्वतंत्र संचालक
व्हीएम मोहन बिगर स्वतंत्र संचालक
एस बालसुब्रमण्यम स्वतंत्र संचालक
कृष्णा श्रीवास्तव स्वतंत्र संचालक
लक्ष्मी अपर्णा श्रीकुमार स्वतंत्र संचालक
संध्या राजन स्वतंत्र संचालक
नाव श्रेणी
कैलासचंद्र झंवर बिगर स्वतंत्र संचालक
विवेक अग्रवाल बिगर स्वतंत्र संचालक
ईआर राज नारायणन बिगर स्वतंत्र संचालक
अशोक रामचंद्रन बिगर स्वतंत्र संचालक
अलका भरुचा स्वतंत्र संचालक
विकास बलिया स्वतंत्र संचालक
सुकन्या कृपालू स्वतंत्र संचालक