कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फ्रान्समधील रहस्यमय विहिर

06:40 AM May 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

फ्रान्समधील रहस्यमय विहिर

Advertisement

फ्रान्सच्या टोनेरी गावात एक रहस्यमय विहिर असून यात शतकांपासून पूर्ण पाणी भरलेले असते. या विहिरीचे नाव फॉसे दीयोन असून याचा फ्रेंचमधील अर्थ ‘पवित्र खड्डा असा आहे.  लोक या विहिरीला पवित्र मानण्यामागे एक कारण देखील आहे. ही प्राचीन विहिर अनेक शतकांपासून रहस्य आणि आकर्षणाचे केंद्र ठरली आहे.

Advertisement

एका झऱ्यातून सातत्याने पाणी वाहायचे, अशा स्थितीत फ्रेंच लोकांनी चहुबाजूने भिंती उभ्या करत याला विहिरीचे स्वरुप दिले, असे सांगण्यात येते. परंतु शतकांपासून लोकांच्या मनात अखेर या विहिरीखाली काय आहे अशी जिज्ञासा कायम राहिली आहे. हे एखाद्या दुसऱ्या जगाचे द्वार असू शकते किंवा याच्या आत एखादा भयंकर जीव लपलेला असू शकतो अशी वदंता आहे.

अनेक जणांचा मृत्यू

अनेक लोकांनी या विहिरीत उतरून तळ गाठण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्यांदा 1908 सली याच्या आत उतरण्याचा प्रयत्न झाला, परंतु त्यावेळी उपकरणांचा अभाव असल्याने पाणबुड्यांना अधिक खोलवर जाता आलेले नाही. मग 1955 साली आणि 1962 साली देखील प्रयत्न करण्यात आले, परंतु ते अपयशी ठरले. 1963 मध्ये आणखी एका टीमने खोलवर पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु दोन पाणबुड्यांचा मृत्यू झाला. मग 1974 मध्ये प्रोफेशनल पाणबुडे आत उतरले आणि कधीच परतले नाहीत. त्यांचे मृतदेह देखील मिळू शकलेले नाहीत. 1996 मध्ये आणखी एक पाणबुड्याच मृत्यूनंतर या रहस्मय विहिरीत उतरण्यावर बंदी घालण्यात आली.

पाण्याचा स्रोत अद्याप रहस्यमय

2019 मध्ये पहिल्यांदाच अनुभवी पाणबुडे पियरे-एरिक डेजेन यांनी विहिरीत 370 मीटरचे अंतर गाठले, परंतु तरीही ते या झऱ्याच्या स्रोतापर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. आतापर्यंत फॉसे दीयोनच्या जलस्रोताचे रहस्य कायम आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article