महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

घरात मिळायची रहस्यमय पत्रं, सत्य कळताच...

06:12 AM Jun 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

घरात कुणी परका शिरत असल्याचे संकेत मिळाल्यास कुणीही घाबरून जाईल. अशा स्थितीत हा चोर पकडण्यास अपयश आले तर भीती आणखीच वाढते. अलिकडेच एका महिलेसोबत असेच घडले आहे. तिने रेडिटवर पूर्ण घटना शेअर केली आहे.

Advertisement

15 एप्रिल रोजी स्टडी टेबलनजीक एक पोस्ट इट नोट मला मिळाली. यात काही आवश्यक कामांचा रिमाइंडर होता, जी मला करायची होती. एखादा स्टॉकर माझ्यासोबत प्रँक करत असल्याचे मला वाटले. यानंतर काही दिवसांनी पुन्हा असेच घडले, घरात कुणी गुपचूपपणे शिरत असल्याच्या कुठल्याही खुणा आढळून आल्या नव्हत्या असे या महिलेने सांगितले.

Advertisement

गेटवर लावला सिक्युरिटी कॅमेरा

काही दिवसांनी घरात पुन्हा एक पत्र मिळाले, यात आमचा घरमालक मला तुला भेटू देत नाही आहे, परंतु हे आवश्यक आहे असे नमूद होते. यानंतर घाबरून मी घराच्या गेटवर सिक्युरिटी कॅमेरे बसवून घेतले. परंतु या कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये केवळ मीच ऑफिसमध्ये जाताना दिसून येत होते. याचमुळे मी रेडिटवर लोकांसमोर माझी समस्या मांडली, पोलिसांकडे जावे का अशी विचारणा केल्याचे महिलेने सांगितले.

कार्बन मोनोऑक्साइड डिटेक्टर

लोकांनी माझ्या या पोस्टवर अनेक कॉमेंट्स केल्या. एका युजरने घरमालक तुम्ही नसताना घरात शिरत असावा असा संशय व्यक्त केला होता, परंतु नोट्स पाहिल्या तर असे वाटत नव्हते. तर एका युजरने तुम्ही स्वत: हे सर्व लिहून विसरून जात असाल असे सुचविले. काही लोकांनी घरात कार्बन मोनोऑक्साइट डिटेक्टर बसविण्याची सूचना केली. कार्बन मोनोऑक्साइटमुळे माणूस गोष्टी विसरू लागतो असे समजल्यावर मी घरात कार्बन मोनोऑक्साइट डिटेक्टर बसविला. घरात हा डिटेक्टर बसविल्यावर याचे रिडिंग 100 पीपीएम असल्याचे कळले असे या महिलेने सांगितले.

सीओ पॉयजनिंग

मला सीओ पॉयजनिंग झाले होते आणि मला कुणी पाठलाग करत असल्याचे वाटत होते. सीओच्या अधिक संपर्कामुळे न्यूरोलॉजिकल डॅमेज होऊ शकते.  सीओच्या पॉयजनिंगमुळे डोकेदुखी, थकवा, उलटी होणे यासारख्या गोष्टी घडू लागतात. तर याचे प्रमाण अधिक झाल्यास माणूस गोष्टी विसरू लागतो, गोंधळल्यासारखा वागू लागतो असे या महिलेने नमूद केले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article