‘ईश्वराच्या नेत्रा’सारख्या रहस्यमय आकृती
कशी निर्मिती झाली हा प्रश्न अनुत्तरितच
पेरुच्या पुनोमध्ये रहस्यमय आकृती आढळून आल्या असून त्या अत्यंत अजब आहेत. विशाल आकाराच्या या आकृती केवळ विमानांमधून किंवा उपग्रहीय छायाचित्रांद्वारे पाहिल्या जाऊ शकतात. या आकृती कुणी निर्माण केल्या, त्यांचा कुठल्या संस्कृतीशी संबंध आहे आणि त्या कधी निर्माण करण्यात आल्या याविषयी कुणाकडेच ठोस माहिती नाही. या आकृत्यांचे डिझाइन खास पॅटर्न दर्शवितात, पेरूचे पुरातत्व स्थळ कॅरल-सुपेमध्ये आढळून आलेल्या ‘ईश्वरीय नेत्रा’च्या आकृतीशी या साधर्म्य दर्शविणाऱ्या आहेत.
कॅरल सुपेमध्ये आढळून आलेली वर्तुळाकृती प्रतिमा इल्ला टेक्सी म्हणजेच इंकासच्या देवतेचे प्रतिनिधित्व करते, जेथे अंतर्गत चक्र किंवा नेत्र आणि संक्रेंदित परिधि ब्रह्मांडचे प्रतिनिधित्व करते. कॅरल-सुपेचे पवित्त शहर कॅरल या नावाने देखील ओळखले जाते. पेरूमधील हे पुरातत्व स्थळ सुपेच्या नॉर्टे चिको संस्कृतीची राजधानी असून अमेरिकेतील सर्वात ज्ञान संस्कृती आहे. हे स्थळ 5 हजार वर्षे जुने असून 626 हेक्टरमध्ये फैलावलेले आहे. या आकृतींना सध्या पुनोच्या कृषीक्षेत्राशी जोडण्यात येते. तथाकथित कॅमेलोन किंवा वारू-वारू एक शक्तिशाली कृषी तंत्रज्ञान होते, ज्याचा प्राचीन काळात दक्ष्णि अमेरिकेच्या अँडीजच्या उंच भागात वापर करणत आला होता, याचा उद्देश रात्रीच्या थंड तापमानात शेतीसाठी उत्तम वातावरण तयार करणे होता असे बोलले जाते.