For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चीनमध्ये फैलावला रहस्यमय आजार, भारतात अलर्ट

06:47 AM Nov 30, 2023 IST | Tarun Bharat Portal
चीनमध्ये फैलावला रहस्यमय आजार  भारतात अलर्ट
Advertisement

श्वसनाशी निगडित आजारामुळे मुले सर्वाधिक प्रभावित : राजस्थान-हरियाणासह 6 राज्यांमध्ये दिशानिर्देश जारी

Advertisement

 वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

चीनमध्ये फैलावलेल्या रहस्यमय आजारावरून केंद्र सरकारने राजस्थान, कर्नाटक, गुजरात, उत्तराखंड, हरियाणा आणि तामिळनाडूला अलर्ट जारी केला आहे. यानंतर राज्य सरकारांनी आरोग्य विभागाला श्वसनाशी निगडित आजाराच्या रुग्णांवरील उपचारासाठी सज्ज राहण्याचा निर्देश दिला आहे. राज्य सरकारांनी लोकांना मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. यात लोकांना गर्दीयुक्त ठिकाणांवर मास्कचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पीडियाट्रिक युनिट्समध्ये मुलांवरील उपचारासाठी पूर्ण व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे. चीनमध्ये रहस्यमय आजारांमुळे लहान मुलेच सर्वाधिक प्रभावित झाली आहेत. तीव्र ज्वरासोबत फुफ्फुसांमध्ये संसर्ग निर्माण करणाऱ्या या आजारामुळे प्रतिदिन सुमारे 7 हजार मुले रुग्णालयात पोहोचत आहेत. कोरोनाप्रमाणेच हा आजारही संक्रामक असल्याचे तज्ञांचे सांगणे आहे.

Advertisement

केंद्र सरकारने 24 नोव्हेंबर रोजी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. भारतात चीनच्या रहस्यमय आजाराचा एकही रुग्ण अद्याप सापडलेला नाही. सरकार याप्रकरणी बारकाईने देखरेख करत असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी सांगितले आहे.

प्लॅटफॉर्मकडून अलर्ट जारी

प्रो-मेड नावाच्या एका सर्व्हिलान्स प्लॅटफॉर्मने 15 नोव्हेंबर रोजी चीनमध्ये फैलावलेल्या रहस्यमय आजारावरून जगभरात अलर्ट जारी केला होता. प्रो-मेडने कोरोनासंबंधी देखील डिसेंबर 2019 मध्ये अलर्ट जारी केला होता. हा प्लॅटफॉर्म मनुष्य आणि प्राण्यांमध्ये फैलावणाऱ्या आजारांची माहिती गोळा करतो. चीनमधील आजार केवळ मुलांपुरती मर्यादित आहे का प्रौढांनाही  लागण होतेय हे प्लॅटफॉर्मने सांगितले नाही. आजार कधीपासून फैलावतोय हे देखील समोर आलेले नाही.

नव्या विषाणूची बाब चीनने नाकारली

23 नोव्हेंबर रोजी चिनी प्रसारमाध्यमांनी शाळांमध्ये रहस्यमय आजार फैलावल्याची माहिती दिली होती. पीडित मुलांच्या फुफ्फुसांमध्ये जळजळ, तीव्र ज्वर, खोकला आणि सर्दी अशी लक्षणे दिसून येत आहेत. आजार फैलावण्यापासून रोखण्यासाठी शाळांना सुटी देण्यात आली. डिसेंबरमध्ये कोरोनामुळे लागू करण्यात आलेले निर्बंध हटविण्यात आले होते, यामुळे पुन्हा आजार फैलावत असल्याचा दावा चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने केला आहे. हा  सामान्य न्युमोनिया आजार आहे. बॅक्sटरिया किंवा विषाणूमुळे हे संक्रमण निर्माण झालेले नाही. हिवाळ्यात व्हायरल आजार फैलावण्याचा धोका अधिक असतो असे आरोग्य प्राधिकरणाने म्हटले आहे.

चीनमध्ये फैलावणाऱ्या आजाराची लक्षणे

खोकला, गळ्यात खवखव, ताप, फुफ्फुसांना सूज, श्वासनलिकेत सूज

महामारी म्हणणे घाईचे ठरेल

चीनने एका पत्रकार परिषदेत श्वसनाशी निगडित आजाराची माहिती दिली होती. चीनमध्ये फैलावलेल्या सर्वप्रकारच्या विषाणूंची यादी मागवत आजारासंबंधी पडताळणी केली जाणार आहे. लोकांना मास्कचा वापर आणि सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करण्याचा निर्देश देण्यात आला असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. तसेच या संघटनेने रहस्यमय आजार महामारी असण्याबद्दल कुठलीच माहिती दिलेली नाही. तर सर्व्हिलान्स प्लॅटफॉर्म प्रो-मेडने याला महामारी म्हणणे चुकीचे आणि घाईचे ठरणार असल्याचे नमूद केले आहे.

Advertisement
Tags :

.