सायबेरियातील रहस्यमय खड्ड्याचा वाढतोय आकार
सायबेरियात एक विशाल खड्डा असून त्याचा आकार सातत्याने वाढत आहे. याचा आकार एखाद्या स्टिंग रे, हॉर्सशू क्रॅब किंवा विशालकाय टॅडपोलसारखा दिसतो. हा खड्डा पूर्वी अत्यंत छोटा होता, 1960 मध्ये पहिल्यांदा याचे उपग्रहाद्वारे छायाचित्र काढण्यात आले होते. परंतु आता खड्डा अत्यंत विशाल आकाराचा झाला आहे. तसेच याचा आकार सातत्याने फैलावत चालला असून माती खचत चालली आहे.
आता या क्रेटरच्या आत पर्वत आणि खोरे तयार होत आहेत. हा सर्व बदल उपग्रहीय छायाचित्रांमध्ये स्पष्ट दिसतो. याचे नाव द बाटागे क्रेटर आहे. या ख•dयाचा आकार सातत्याने का वाढतोय असा प्रश्न वैज्ञानिकांना सतावू लागला आहे. युएसजीएसनुसार हा खड्डा आणि यात निर्माण झालेले छिद्र 1991 च्या तुलनेत तीनपट वाढले आहे. बाटागे क्रेटरला कधीकधी लोक बाटागाइका असेही संबोधितात, याचा अर्थ नर्काचे द्वार असा होतो. तर काही लोक पृथ्वीवर सातत्याने कुठल्या न कुठल्याही समस्या निर्माण होण्यामागे याच खड्डा कारणीभूत असल्याचे मानतात.
आर्क्टिकचा भाग अत्यंत वेगाने तप्त होत आहे, यामुळे तेथील पर्माफ्रॉस्ट वितळत आहे. पर्माफ्रॉठ हे माती आणि बर्फाचे मोठे आवरण असून जे नेहमीच गोठलेल्या स्थितीत होते, पंतु आता असे राहिले नाही. बाटागे क्रेटर प्रत्यक्षात खड्डा नसून पर्माफ्रॉस्टचा एक हिस्सा आहे, जो वेगाने वितळत आहे. याला रेट्रोग्रेसिव्ह थॉ स्लंप म्हटले जाते. अशा ठिकाणी वेगाने भूस्खलन होते, तीव्र खोरे तयार होते आणि याचबरोबर खड्डा निर्माण होतात. आर्क्टिक सर्कलमध्ये अशा थॉ स्लंप अत्यं अधिक आहेत. परंतु बेटागे तर मेगास्लंप ठरले आहे. वॉशिंग्ट युनिव्हर्सिटीचे जियोफिजिसिस्ट रोजर मिचेल्डिस यांनी पर्माफ्रॉस्ठ फोटोजनिक ठिकाण नसल्याचे म्हटले आहे.
पृथ्वीच्या भविष्याचा थांगपत्ता लागणार
ही एक गोठलेली धूळयुक्त जागा आहे. ओली माती आणि बर्फाचा भयानक साठा असून तो वेगाने वितळतो, तेव्हा बाटागे क्रेटरप्रमाणे स्लंप तयार होतो. या खड्डयाचे अध्ययन केल्यामुळे आमच्या पृथ्वीच्या भविष्याचा शोध घेता येणार आहे, कारण पर्माफ्रॉस्ठमध्sय मृत रोप, प्राणी असतात, तसेच ते शतकांपासून गोठलेल्या स्थितीत असतात. यामुळे पर्माफ्रॉस्टमध्ये कार्बन डायऑक्साइड आणि मिथेन यासारखे वायू जमा झालेले असतात. तेथे उष्णता शोषून घेणारे वायू असतात, यामुळे देखील तापमानवाढ होते आणि यातून पर्माफ्रॉस्ट वेगाने वितळतात, उत्तर गोलार्धात 15 टक्के हिस्सा पर्माफ्रॉस्टचा आहे, असे रोजर यांनी सांगितले.