महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एम.व्ही.हेरवाडकर, केएलई विजयी

10:14 AM Nov 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मृदुला सामंत स्मृती चषक फुटबॉल स्पर्धा : केएलएस, झेवियर्स, संत मीरा, सेंट मेरीजचे सामने बरोबरीत

Advertisement

बेळगाव  : एसकेई सोसायटी जीएसएस महाविद्यालय व बेळगाव जिल्हा फुटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या मृदुला सामंत आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत एम. व्ही. हेरवाडकरने शेख सेंट्रलचा, केएलई इंटरनॅशनलने कॅन्टोन्मेंट संघाचा पराभव करुन प्रत्येकी दोन गुण मिळविले. तर सेंट झेवियर्सला केएलएसने, सेंट मेरीजने संतमीराने शुन्य बरोबरीत रोखले.आरपीडी महाविद्यालयाच्या मैदानावर मृदुला सामंत चषक फुटबॉल स्पर्धेच्या मंगळवारी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात एम. व्ही. हेरवाडकर संघाने शेखसेंट्रल संघाचा 2-0 असा पराभव केला. या सामन्यात पहिल्या मिनिटांपासूनच हेरवाडकरने आक्रमक चढाया सुरू केल्या. 15 व्या मिनिटाला अनिश घोरपडेच्या पासवर ऋषब बळ्ळारने गोल करुन 1-0 ची आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात शेख सेंट्रलने गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. 34 व्या मिनिटाला शेखच्या शाबाजने गोल करण्याची नामी संधी दवडली. 37 व्या मिनिटाला ऋषब बळ्ळारच्या पासवर शुभम कोरेने दुसरा गोल करुन 2-0 ची आघाडी मिळवून दिली. शेखसेंट्रल संघाने गोल करण्यासाठी बरेच प्रयत्न केले. पण हेरवाडकरच्या बचाव फळीसमोर त्यांचे प्रयत्न असफल ठरले.

Advertisement

दुसऱ्या सामन्यात केएलई इंटरनॅशनलने कॅन्टोन्मेंट संघाचा 4-1 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात ऋषभ बागीच्या पासवर कुनाल हरिश्चंद्रने गोल करुन 1-0 ची आघाडी मिळवून दिली. 22 व्या मिनिटाला कॅन्टोन्मेंटच्या श्रेयश उसुलकरच्या पासवर अतिफ शेखने गोल करुन 1-1 अशी बरोबरी करीत सामन्यात रंगत निर्माण केली. दुसऱ्या सत्रात मात्र केएलईने आक्रमक चढाया सुरू केल्या. 28, 35 व 39 व्या मिनिटाला ऋषभ बागीने सलग तीन गोल करुन हॅटट्रीक साधत 4-1 अशी महत्त्वाची आघाडी केएलईला मिळवुन दिली. तिसऱ्या सामन्यात संतमीरा संघाने सेंटमेरीज संघाला शुन्य बरोबरीत रोखले. या सामन्यात संतमीराच्या प्रथमेश कंग्राळकरने गोल करण्याची नामी संधी 15 व्या मिनिटाला दवडल्याने पहिल्या सत्रात गोल फलक कोराच राहिला. 25 व्या मिनिटाला सेंट मेरीजच्या आदी तारकरने मारलेला फटका गोल पोस्टला लागून बाहेर गेला. या सामन्यात दोन्ही संघांना गोल करण्याच्या नामी संधी मिळाल्या होत्या. पण त्याचा दोन्ही संघांना फायदा उटविता आला नाही. त्यामुळे सामना शुन्य बरोबरीत राहिला.

चौथ्या सामन्यात बलाढ्या सेंट झेवियर्सला केएलएसने शुन्य बरोबरीत रोखले. या सामन्यात 12 व्या मिनिटाला झेवियर्सच्या माहीदने  मारलेला वेगवान फटका केएलएसचा गोलरक्षक जनक पटेलने उकृष्ट अडविला.  20 व्यामिनिटाला केएलएसच्या प्रणव लाडने गोल करण्याची संधी दवडल्याने पहिल्या सत्रात गोल फलक कोराच राहिला. दुसऱ्या सत्रात झेवियर्सच्या तेजराज व सुफीयन यांनी गोल करण्याची संधी दडवली. या सामन्यात केएलएसचा गोलरक्षक जनक पटेलने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडविल्याने सामनाबरोबरीत राहिला.

बुधवारचे सामने

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article