मुतगे ग्राम पंचायतीने ग्रामसभा-मासिक बैठकींची माहिती देण्याची मागणी
सांबरा : मुतगे ग्रामपंचायतीने सन 2021 ते 2025 पर्यंत घेतलेल्या ग्रामसभांची व मासिक बैठकींची माहिती द्यावी, तसेच या कालावधीत केलेल्या कामांची सविस्तर माहिती देण्याची मागणी निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, सन 2021 ते 2025 या कालावधीमध्ये ग्रामपंचायतीने घेतलेल्या ग्रामसभांची व मासिक बैठकांची माहिती द्यावी व सदर बैठकीत मांडलेल्या ठरावांची प्रतही द्यावी. तसेच या कालावधीत कोणत्या योजनेतून शासनाकडून किती निधी आला आहे व कोणत्या कार्यासाठी तो निधी वापरण्यात आला आहे. याची सविस्तर माहिती कागदपत्रांसहित सात दिवसाच्या आत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच ग्रामपंचायतीने माहिती न दिल्यास जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. ग्रामस्थांनी अनेकवेळा मागणी करून देखील ग्रामपंचायतींकडून माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. पीडिओ बसवंत कडेमणी यांना निवेदन देताना शांताराम पाटील, सागर पाटील, सयाजी पाटील, तुकाराम पाटील, उमेश पुरी, दीपक पुरी, सुरज पाटील, कृष्णा पाटील, सातेरी पाटीलसह ग्रामस्थ उपस्थित होते.