महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आमदार दिगंबर कामत यांनी भेट टाळल्याचा मुस्लिम बांधवांचा दावा

03:14 PM Dec 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

धार्मिक संस्थांत हस्तक्षेप करीत नाही : कामत

Advertisement

मडगाव : मालभाट-मडगाव येथील सुन्नी जामिया मशिदच्या सदस्यांनी स्थानिक आमदार दिगंबर कामत यांची भेट घेण्यासाठी त्यांची वेळ मागून घेतली होती. मात्र, आमदार श्री. कामत यांनी त्यांना मालभाट येथील निवासस्थांनी भेटण्याचे टाळले असा दावा सुन्नी जामिया मशिदच्या सदस्यांनी केला आहे.या संदर्भात आमदार दिगंबर कामत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आपल्याला गोव्याबाहेर जावे लागले. त्यामुळे मुस्लिम बांधवांना भेटणे शक्य झाले नाही. आपण भेटू शकणार नाही याची कल्पना त्यांना मेसेज पाठवून दिली होती. जर मशिदसंदर्भातील विषय असेल तर आपण कोणत्याही धार्मिक संस्थांच्या कामकाजात हस्तक्षेप करीत नाही असे श्री. कामत म्हणाले.     भाजपचे प्रवक्ते उर्फान मुल्ला आणि मोती डोंगर येथील आमदार दिगंबर कामत यांच्या समर्थकांच्या हस्तक्षेपामुळे मुस्लिम समाज व्यथित झाल्याचे आमदार श्री. कामत यांना भेटण्यासाठी आलेल्या मुस्लिम समाजातील सदस्यांनी म्हटले आहे. मुस्लिम समाजातील सदस्यांचे म्हणणे आहे की, हे लोक त्यांच्या राजकीय ‘गॉडफादर’च्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या राजकीय फायद्यासाठी समाजात फूट पाडण्याच्या कुटिल हेतूने समुदायांमध्ये मतभेद निर्माण करत आहेत. त्यांनी कोणतीही सर्व साधारण सभा न घेता सुन्नी जामिया मशिदीचे व्यवस्थापन ताब्यात घेतले आहे. व्यवस्थापकीय समिती निवडण्यासाठीही निवडणुका घेण्यात आल्या नाहीत, पण राजकीय ताकदीचा वापर करून ते मशिदीत आणि मुस्लिम समाजात सर्व प्रकारच्या समस्या निर्माण करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Advertisement

खोटी व बनावट कागदपत्रे विविध शासनाकडे पाठविण्यात आल्याचा दावा ही मुस्लिम समाजातील सदस्यांनी केला आहे. समाजातील सदस्यांना धमकावण्यासाठी राजकीय ‘बॉस’च्या दबावाचा वापर केला जातो असा आरोपही केला आहे. मुस्लिम समाजाने नेहमीच दिगंबर कामत यांना पाठिंबा दिला आणि त्यामुळे या प्रकरणी त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागायचे होते, मात्र, त्यांनी शिष्टमंडळाला बगल दिली. आपण भेटू शकणार नाही हे कळवण्याचे सौजन्य त्यांच्याकडे नव्हते असा आरोपही करण्यात आला आहे. मुस्लिम समाजाला नेहमीच पोकळ आश्वासने मिळतात आणि समाजाला गृहीत धरतात. आता भाजपमध्ये उडी घेतल्यानंतर दिगंबर कामत यांना अल्पसंख्याक आपल्याला मतदान करणार नाहीत याची जाणीव असल्याने ते फूट पाडा आणि राज्य करा, असे राजकारण करीत असल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. 30 वर्षांपासून कब्रस्तानचा प्रŽ सुटलेला नाही असा ही दावा करण्यात आलेला आहे. द्वेषाचे आणि विभाजनाचे राजकारण करणाऱ्यांना येत्या निवडणुकीत किंमत चुकवावी लागेल असा इशारा मुस्लिम समाजाने दिला.

कादर शहा याची जामिया मशिदमधून हकालपट्टी

दरम्यान, या संदर्भात उर्फान मुल्ला यांच्याशी संपर्क साधला असता, श्री. मुल्ला म्हणाले की, कादर शहा याची माटभाट-मडगाव येथील सुन्नी जामिया मशिदमधून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. तशी सार्वजनिक सूचनाही जारी करण्यात आलेली आहे. कादर शहा याचे ‘पीएफआय’शी संबंध असल्यानेच त्यांची जामिया मशिदमधून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. त्यामुळे ते वैफल्यग्रस्त झाले असून मुस्लिम बांधवांना भडकावण्याचा प्रयत्न करीत आहे. शहा यांचे अन्य राजकीय पक्षाशी संबंध असल्याने ते भाजपला व आमदार दिगंबर कामत यांना टार्गेट करीत असल्याचा आरोपही उर्फान मुल्ला यांनी केला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article