महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

टेस्लाच्या कर्मचाऱ्यांना घेतले मस्क यांनी फैलावर

07:00 AM Apr 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आगामी काळात 20 टक्के कर्मचारी कपात

Advertisement

टेक्सास : टेस्ला या दिग्गज कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी अलीकडेच आपल्या कर्मचाऱ्यांना चांगलेच सुनावले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. आगामी काळामध्ये कंपनी 20 टक्के कर्मचाऱ्यांना कमी करणार असल्याचेही बोलले जात आहे. कंपनीने चार महिने आधी एका नव्या विपणन संघाची स्थापना केली होती. याचे नेतृत्व वरिष्ठ व्यवस्थापक एलन इंग्राम यांच्याकडे आहे. याच दरम्यान कंपनीचे सर्वेसर्वा एलॉन मस्क यांनी अलीकडेच या नव्या संघातील कर्मचाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले असल्याचे सांगितले जात आहे. कंपनी सध्या अतिरिक्त खर्चावर मर्यादा आणत खर्च कमीत कमी करण्याच्या दिशेने वाटचाल करते आहे.

Advertisement

किती जणांना करणार कमी

या अंतर्गतच आगामी काळामध्ये 20 टक्के इतके कर्मचारी कमी केले जाणार असून त्यांची संख्या 20 हजाराच्या घरात असेल असेही बोलले जात आहे. जागतिक स्तरावरती कंपनीच्या इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीवरती नकारात्मक परिणाम झाला असल्याने एलॉन मस्क हे सध्या चिंतेत असल्याचे सांगितले जाते. स्पर्धा इतकी ताणली गेली आहे की काही देशातील कार्सच्या किमती देखील कंपनीने कमी केल्याचे बोलले जाते.

बातमीचा समभागावर परिणाम

कर्मचारी कमी करण्याच्या बातमीनंतर टेस्लाच्या समभागावरती शेअर बाजारात नकारात्मक परिणाम दिसून आला. टेस्लाचे समभाग जवळपास तीन टक्के इतके घसरणीत दिसून आले. गेल्या वर्षभरामध्ये पाहता टेस्लाच्या समभागामध्ये 40 टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article