मस्क दादा कमावतात तासाला 100 कोटी
दरवर्षीच संपत्ती वाढविण्यासाठी दिग्गज उद्योगपतींमध्ये चढाओढ होताना दिसते. यंदाही तशी चढाओढ दिसून आली आहे. यंदा आपली संपत्ती वाढविण्यामध्ये टेस्लाचे सर्वेसर्वा आणि दिग्गज उद्योगपती एलॉन मस्क यांनी बाजी मारली आहे. 27 डिसेंबरपर्यंतएलॉन मस्क यांनी प्रत्येक तासाला 100 कोटी रुपयांची दमदार कमाई केली आहे. भारतीय रुपयात पाहता मस्क यांनी वर्षाला 84.10 लाख कोटी रुपये कमावले आहेत. तासाच्या तुलनेमध्ये पाहता संपत्तीत झालेली ही वाढ लक्षणीय अशीच मानली जात आहे. 2023 हे वर्ष एलॉन मस्क यांच्यासाठी भाग्यदायी ठरले आहे. यावरुन त्यांच्या श्रीमंतीपणाचा ऐट दिसून यावा. तर दुसरीकडे भारताचे दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानीही संपत्ती वाढवण्यामध्ये पुढे राहिले आहेत. ब्लूमबर्ग बिलेनियरच्या निर्देशांकाने ही नवी ताजी यादी नुकतीच प्रसिद्ध केली आहे, त्यात ही माहिती पुढे आली आहे.
भारतातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांनी प्रत्येक तासाला 8.80 कोटी रुपये कमावले आहेत. 361 दिवसांमध्ये एलॉन मस्क यांनी 84,10,27,0000000 कोटी रुपये एकंदर कमावले आहेत. ब्लुमबर्ग बिलेनियर निर्देशांकाने श्रीमंतांची यादी नुकतीच प्रसिद्ध केली असून त्यामध्ये एलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी यावर्षी आपल्या संपत्तीत सर्वाधिक वाढ केली आहे. याचाच अर्थ मस्क यांनी यावर्षी प्रत्येक दिवशी सरासरी तासाला 100 कोटी रुपयांची संपत्ती जोडली आहे. दुसरीकडे फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग हे यंदा अब्जाधीशांच्या यादीत दुसऱ्या स्थानी राहिले आहेत. यावर्षी त्यांनी आतापर्यंत आपल्या संपत्तीत 83.8 अब्ज डॉलर्स रकमेची भर घातली आहे. आज त्यांची एकूण संपत्ती 129 अब्ज डॉलर्स रुपयांची आहे. प्रत्येक तासाला झुकरबर्ग यांनी 80,54,04,662.97 रुपये कमावले आहेत. 361 दिवसांच्या कालावधीमध्ये मार्क झुकरबर्ग यांनी आपल्या संपत्तीत एकंदर भारतीय रुपयांत 69.78 लाख कोटी रुपयांची वाढ केली आहे. यायोगे पाहता झुकेरबर्ग हे तासाला 80.54 कोटी रुपये कमावतात. तर मिनिटांच्या हिशोबाने पाहता झुकरबर्ग 1.34 कोटी रुपये कमावतात, असेही दिसून आले आहे. सातत्याने त्यांच्या संपत्तीमध्ये वाढ होत आली आहे.
या यादीत रिलायन्सचे उद्योगपती अंबानी हेही आघाडीवर राहिले आहेत. दूरसंचार, तेल, रिटेल क्षेत्र, गॅस, पेट्रोलियम उत्पादन, पॉलिस्टर उत्पादने, रसायने, सिंथेटिक कापड, ज्वेलरी,
फॅशन यासह इतर क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी यावर्षी आपल्या संपत्तीत 9.16 अब्ज
डॉलर्सची भर घातली आहे. एकंदर त्यांच्या कमाईकडे पाहिल्यास प्रत्येक तासाला पाहता ते 8.80 कोटी कमावतात, असेही अहवालामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. तर मिनिटांच्या हिशोबाने पाहता अंबानी यांनी आपल्या संपत्तीमध्ये 14.67 लाख रुपयांची भर घातली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची आर्थिक वर्ष 2023 मध्ये एकत्रित उलाढाल 9.7 ट्रिलियन रुपयांची राहिली आहे.