महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी संगीत संमेलने आवश्यक

11:55 AM Dec 18, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आमदार प्रविण आर्लेकर यांचे प्रतिपादन ,संवादी संगीत संस्थेच्या संगीत संमेलनाचे उद्घाटन

Advertisement

पेडणे : भारतीय संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी संगीत संमेलनांची गरज असून अशा प्रकारची संमेलने गावोगावी आयोजित केली पाहिजेत, पेडणे तालुक्मयातील संगीत परंपरा खूप मोठी आहे. अशा संमेलनातून कलाकारांना व्यासपीठ मिळत असते  असे प्रतिपादन पेडण्याचे आमदार आणि हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष प्रविण आर्लेकर यांनी धारगळ येथे काढले. संवादी संगीत संस्थेच्या नवव्या संगीत संमेलनाच्या उद्घाटन समयी आर्लेकर बोलत होते. पेडणे तालुक्मयात नवनवीन कलाकार नावारूपास यावेत आणि त्यांनी आपली कला राष्ट्रीय पातळीवर सादर करावी. तसेच पालकांनी आपल्या मुलांना संगीत क्षेत्रात करीअर घडवण्यासाठी प्रोत्साहन द्यावे. आपल्याकडून सर्व कलाकारांना संपूर्ण सहकार्य मिळेल, याची हमीही त्यांनी याप्रसंगी दिली. संमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध संगीतकार सुधाकर करंदीकर यांच्या शुभहस्ते पार पडले. यावेळी व्यासपीठावर आमदार प्रविण आर्लेकर, जिल्हा परिषद सदस्य मनोहर धारगळकर, धारगळचे सरपंच अर्जुन कानुळकर, स्थानिक पंच प्रदीप नाईक, धारेश्वर माऊली देवस्थानचे अध्यक्ष प्रकाश प्रभुदेसाई आणि संवादी संगीत संस्थेचे अध्यक्ष दीपक देवस्थळी उपस्थित होते.

Advertisement

संगीत क्षेत्रात योगदान दिलेल्या कलाकारांचा सत्कार

संमेलनामध्ये संगीत क्षेत्रात योगदान दिलेले महानंद कोठावळे, विलास उर्फ बंड्या धारगळकर तसेच तबला बनवणारे आणि देश विदेशात ज्यांचे तबला सेट पोचले आहेत असे मेहनती कलाकार सुरेशमाम पंडित यांचा आर्लेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुधाकर करंदीकर यांनी आपल्या मनोगतातून संस्थेस शुभेच्छा दिल्या. प्रदीप नाईक यांनीही आपले विचार मांडले. दीपक देवस्थळी यांनी प्रास्तविक आणि स्वागत केले आणि सरतेशेवटी ऋणनिर्देश केला. केशव पणशीकर आणि हेमंत केरकर यांनी मान्यवरांना पुष्पगुच्छ प्रदान केले. उद्घाटनपूर्वीच्या सत्रात प्रसाद शेवडे आणि गीतगंधा गाड यांचे नाट्यागीत गायन झाले. त्यांना ऑर्गनवर दत्तराज सुर्लकर तर तबलासाथ दयानंद कांदोळकर यांनी केली. नंतरच्या सत्रामध्ये लक्ष्मीकांत खांडेकर यांचे सतारवादन सादर केले. त्यांना गोरक्षनाथ सावंत यांनी तबलासाथ केली. शेवटच्या सत्रात लातूरचे सुप्रसिध्द शास्त्रीय गायक ईश्वर घोरपडे यांनी केदार रागातून ख्याल सादर केला आणि अमृताची फळे हा संत तुकाराम महाराजांचा अभंग प्रस्तुत करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना राया कोरगांवकर, संकेत खलप, सात्त्वकि नाईक, स्मिता कानुळकर आणि मालिनी परब यांनी केली. तिन्ही सत्रांचे निवेदन संजय कात्रे यांनी केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article